सामंथा रहस्यमय ठिकाणी कैद, ‘यशोदा’चा फर्स्ट लूक (Video)

‘पुष्पा’ चित्रपटातील लोकप्रिय गाणे ‘ऊ अंटावा’ मधून धुमाकूळ घालणारी अभिनेत्री सामंथा रुथ प्रभु (samantha ruth prabhu) नव्या चित्रपटात दिसणार आहे. तिच्या आगामी चित्रपटाचा ‘यशोदा’चा (Yashoda) फर्स्ट लुक रिलीज झाला आहे.

सामंथाने एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केला आहे. यामध्ये दाखवण्यात आलंय की, ती पटकन डोळे उघडते आणि ती अनुभव घेते की, तिच्या आजूबाजूचे जे विश्व ती पाहते, ते आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही. वातावरण, तिचे कपडे, घड्याळ आणि मौन सर्वकाही वेगळं दिसत होतं. तिची धडधड वाढली होती. ती समोर पाहते तर एक खिडकीसमोर कबुतर दिसतं. ती खिडकी उघडते. ती कबूतरला पकडायला जाते; पण त्याला स्वातंत्र्य हवं आहे…  (samantha ruth prabhu)ती एका रहस्यमय जगात दिसते. ‘यशोदा’ या व्हिडिओमध्ये चित्रपटाची पहिली झलक दिसते. सामंथाचा फर्स्ट लुक खूप कमालीचा आहे.

समंथा स्टारर श्रीदेवी मुव्हीज ‘यशोदा’ ही दिग्दर्शक जोडी हरी-हरीश बनवत आहे. यामध्ये प्रसिद्ध अभिनेते वरलक्ष्मी सरथकुमार, उन्नी मुकुंदन, राव रमेश, मुरली शर्मा आणि संपत राज यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘यशोदा’चा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे.

निर्माते शिवलेंका कृष्णा प्रसाद याविषयी म्हणाले, ‘सामंथाची ‘फॅमिली मॅन २’ वेब सीरीजमधील भूमिका चाहत्‍यांच्‍या पसंतीस उतरली हाेती. त्यांचा आवाका लक्षात घेऊन आम्ही कोणतीही तडजोड न करता हा प्रकल्प करत आहोत. सामंथाची कामगिरी पाहून मला अभिमान वाटतो. फाईट मास्टर वेंकट यांच्या देखरेखीखाली आम्ही कोडाईकनालमध्ये एप्रिलमध्ये क्लायमॅक्स शूट केला. आम्ही आधीच ८० टक्के शूटिंग पूर्ण केले आहे. तर हैदराबादमध्ये शेवटचे शेड्यूल पूर्ण केले आहे. १ जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शूटिंग सुरू राहणार आहे.

या चित्रपटात स्पेशल इफेक्ट्सचीही प्रमुख भूमिका आहे. आमच्या हरी-हरीश या दिग्दर्शक जोडीचे काम प्रभावी आहे. १२ ऑगस्ट रोजी तेलुगू, तामिळ, हिंदी, कन्नड, मल्याळम या भाषांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित करण्याची योजना आहे.

हेही वाचा :


झुकेरबर्गची मोठी घोषणा : Whatsapp मध्ये मिळाली मोठी अपडेट!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *