करण जोहरच्या पार्टीत शाहरुखचा ‘कुछ कुछ होता है’मधील गाण्यावर डान्स

karan johar

निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने (karan johar) नुकताच त्याचा 50वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त त्याने मुंबईतील यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं. अवघं बॉलिवूड या पार्टीला अवतरलं होतं. रेड कार्पेटवरील सेलिब्रिटींचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता या पार्टीतील काही व्हिडीओ समोर येत आहेत. त्यातल्याच एका व्हिडिओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

या व्हिडीओमध्ये बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा त्याच्या ‘कुछ कुछ होता है’ (Kuch Kuch Hota Hai) या गाजलेल्या चित्रपटातील गाण्यावर नाचताना पहायला मिळत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. करण जोहरनेच(karan johar) ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. आजही हा चित्रपट अनेकांच्या आवडीच्या चित्रपटांच्या यादीमध्ये आवर्जून आढळतो. या चित्रपटात शाहरुखसोबत काम करणारे कलाकार काजोल आणि राणी मुखर्जीसुद्धा वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित होते.

 

या व्हिडीओमध्ये शाहरुख ‘कोई मिल गया’ या गाण्यावरील स्टेप्स करताना दिसत आहेत. त्याच्यासोबत दिग्दर्शिका फराह खानसुद्धा नाचताना पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे फराह खाननेच या गाण्याची कोरिओग्राफी केली होती. अभिनेता मनिष पॉलसुद्धा शाहरुखसोबत डान्स करताना दिसत आहे. 1998 मध्ये ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून करण जोहरने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. यामध्ये शाहरुखच्या भूमिकेचं नाव ‘राहुल’ होतं. यावरूनच नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. ‘ओह माय गॉड! राहुल परत आलाय’, असं एकाने लिहिलं. तर ‘हा व्हिडीओ स्वप्नवत आहे, मी कितीही वेळा पाहू शकते’ असं दुसऱ्या युजरने म्हटलं.

करण जोहरच्या या पार्टीत अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, करीना कपूर खान, सैफ अली खान, मलायका अरोरा, सलमान खान, आमिर खान, मनिष मल्होत्रा, जान्हवी कपूर, हृतिक रोशन, राणी मुखर्जी, काजोल यांसारखे अनेक कलाकार उपस्थित होते. केवळ बॉलिवूडच नाही तर टॉलिवूडमधील विजय देवरकोंडा, रश्मिका मंदाना, तमन्ना भाटिया हे कलाकारसुद्धा पार्टीला हजर होते.

हेही वाचा:


Attention! स्त्रियांना कमाईची मोठी संधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *