आर्यन खाननं घेतला मोठा निर्णय!

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई क्रुझ ड्रग्ज (drugs) केस प्रकरणात क्लीनचिट मिळाली आहे. २०२१ मध्ये आर्यन खानला २६ दिवसांसाठी अटक केलं गेलं होतं आणि तो जेलमध्ये राहिला होता. अर्थात,त्यानंतर आर्यन खानला जामिन मिळाला होता. त्या दिवशी मन्नत मध्ये दिवाळी साजरी करण्यात आली होती. अटक झाल्याच्या काही महिन्यानंतर आता आर्यन खानला या केसमधून क्लीनचीट मिळाली आहे. २७ मे ला आर्यन खानचा लहान भाऊ अबराम खानचा वाढदिवस होता. मन्नत मध्ये यादिवशी डबल सेलिब्रेशन केलं गेलं. आता आर्यन खानला ड्रग्ज केसमध्ये क्लीनचीट मिळाल्यानंतर चर्चा रंगली आहे ती तो भारत सोडून अमेरिकेत स्थायिक होण्याची. चला जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
आर्यन खान अमेरिकेत जाण्याच्या बातमीनं जोर धरला आहे. काही जवळच्या सूत्रांनी सांगितलं आहे की,”आता आर्यन खानला ड्रग्ज (drugs) केस प्रकरणात क्लीनचिट मिळाली आहे, आता कायद्यानं त्याच्यावर जी बंधनं लादली होती ती अर्थातच यानंतर काढण्यात आली आहेत आणि तो आता आंतरराष्ट्रीय प्रवास करू शकतो. त्यामुळे आर्यन खाननं आता अमेरिकेला निघून जाणाचा निर्णय घेतला आहे. पण तो तिथे स्थायिक होण्यासाठी कायमचा निघून जाणार नाही. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवरील एका शोसाठी त्यानं हा निर्णय घेतला आहे. आर्यन खानला स्क्रिप्ट रायटिंग मध्ये करिअर करायचं आहे. आणि त्यासाठीच अमेरिकेत जाऊन काही गोष्टींचं आकलन करण्यासाठी,त्या शिकण्यासाठी तो अमेरिकेत जात आहे”.
याआधी बातमी होती की आर्यन खान अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ सोबत एका शो वर काम करीत आहे, ज्या शो च्या दिग्दर्शनाची सूत्र कदाचित त्याच्याकडे जातील अशी चर्चा देखील होती. या प्रोजेक्ट संदर्भात एका इंग्रजी वेसबाईटला मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खान शो च्या स्क्रिप्टिंगसोबत त्याचं दिग्दर्शनही करणार असल्याचं कळत आहे. पुढील दोन दिनसात जे टेस्ट शूट होणार आहे यासंदर्भात आर्यन पूर्ण जबाबदारी घेणार असल्याचं बोललं जात आहे.
सूत्रांनी पुढे सांगितलं की, ”आर्यन खानला अमेरिकेत आपल्यासोबत शो च्या टीमला देखील घेऊन जायची इच्छा आहे. प्रोजेक्टसंदर्भात त्याला आणखी सविस्तर अभ्यास करायचा आहे. त्यानंतर तो शूटिंग सुरू करण्याच्या विचारात आहे. आर्यन खान आपल्या त्या प्रोजेक्ट संदर्भात खूप उत्सुक आहे. अद्याप या शो चे नाव सांगण्यात आले नसले तरी आर्यन खानने या शो च्या प्री-प्रॉडक्शनला सुरुवात केली असल्याचं मात्र समजतंय. लवकरच शूटिंगच्या तारखाही फायनल केल्या जातील अशीही कन्फर्म बातमी मिळालेली आहे”.
हेही वाचा :