बेडरुमच्या Video मुळे पत्नीसोबतचे शाहिदचे रोमँटिक क्षण सर्वांसमोर..!

एकटा शाहिद वगळला, तर ती हिंदी कलाजगतामध्ये इतर कोणालाही ओळखत नव्हती… पण, पाहता पाहता तिनं शाहिदशी लग्नगाठ बांधली आणि कपूर कुटुंबाचा एक अविभाज्य भाग झाली. ही ‘ती’ आहे, शाहिदची पत्नी, मीरा राजपूत (mira rajput).
मीरा आणि शाहिदनं कायमच त्यांच्या नात्यातून अनेक नव्या जोड्यांना Couple Goals दिले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांचीही केमिस्ट्री कायमच पाहायला मिळाली आहे.
पण, आता ही जोडी नव्या कारणामुळे चर्चेत आहे. ते कारण म्हणजे व्हायरल होणारा त्यांचा बेडरूम व्हिडीओ.
या व्हिडीओमध्येही शाहिद आणि मीराची केमिस्ट्री पाहणाऱ्यांच्या नजरा वळवत आहे. इथं मीरा पलंगावर एक पुस्तक वाचताना दिसत आहे. तर शाहिद त्याचे कपडे व्यवस्थित करताना दिसत आहे. काही क्षणांतच मीरा (mira rajput) पुस्तक बंद करुन झोपते.
मीरा झोपताना पाहून शाहिदला भलताच आनंद होतो आणि तो तोंडातल्या तोंडात म्हणतो… ‘मी आणि माझा नवा टीव्ही…. ‘. व्हिडीओचा शेवट सर्वांच्याच डोळ्यावर हास्य आणतो.
टीव्हीचा रिमोट कोणाकडे असणार इथपासून कोणता चॅनल पाहणार इथपर्यंत जिथं अनेक जोड्यांमध्ये वाद होताना दिसतात तिथंच शाहिद आणि मीरा मात्र आमचं सगळं इतकं सोपं आहे…. याच अविर्भावात असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं.
हेही वाचा :