शाहरुख खानच्या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणार ‘ही’ साऊथ सुंदरी

साऊथ अभिनेत्री (South Actress) सध्या बॉलिवूडमध्ये सक्रिय झालेल्या दिसून येत आहेत. रश्मिका मंदना, समंथा प्रभू नंतर आता नयनतारासुद्धा त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकणार आहे. अभिनेत्री नयनतारा सध्या तिच्या आगामी चित्रपट ‘कथुवाकुला रेंदू कादल’ (Kaathu Vaakula Rendu Kaadhal) च्या रिलीजची वाट पाहात आहे. ज्यामध्ये ती विजय सेतुपतीसोबत दिसणार आहे. या चित्रपटात समंथा आणि तृषाही दिसणार आहेत. ही अभिनेत्री साऊथमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या तिने तमिळ व्यतिरिक्त इतर भाषांमध्येही अनेक प्रोजेक्ट्स साइन केले आहेत.लवकरच ही अभिनेत्री शाहरुख खानच्या (Shahrukh Khan movie) चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे.
नुकतंच नयनतारा स्टारर मल्याळम चित्रपट ‘गोल्ड’ चा टीझर 22 मार्च रोजी रिलीज झाला होता. या टीझरला फक्त 2 दिवसात 7 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, ती चिरंजीवी स्टारर ‘गॉडफादर’ या चित्रपटातही दिसणार आहे. ज्यामध्ये सलमान खानचीही झलक पाहायला मिळणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नयनताराने तेलुगू चित्रपट ‘गॉडफादर’चे शूटिंग पूर्ण केलं आहे. आणि आता ती शाहरुख खानसोबत बॉलिवूड डेब्यूसाठी मुंबईला रवाना होणार आहे.
तामिळ, तेलुगु आणि मल्याळममध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे नयनतारा होय. साऊथ सुंदरी नयनतारा आता किंग खान शाहरुखसोबत हिंदी चित्रपटात पदार्पण करणार आहे.ही जोडी अॅटली यांच्या चित्रपटात मुख्य भूमिकेत पडद्यावर एकत्र दिसणार आहे. शाहरुख आणि नयनतारा पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अभिनेत्री मुंबईला भेट देईल आणि त्यांनतर अॅटली-शाहरुख खानच्या चित्रपटाच्या (movie) शूटिंगच्या नवीन शेड्यूलची तयारी करेल, असं म्हटलं जात आहे.
अभिनेत्री नयनतारा मुंबईतील फिल्मसिटी स्टुडिओमध्ये तिच्या आठवडाभर होणाऱ्या शूटिंगसाठी खूप उत्सुक आहे. आणि लवकरच बॉलिवूड चित्रपटाचे शेड्यूल केल्यानंतर, ती ‘कथुवकुला रेंदू कादल’ च्या रिलीजच्या आधी चेन्नईला परतणार आहे. अॅटली दिग्दर्शित या चित्रपटात नयनतारा एका तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान दुहेरी भूमिकेत दिसणार असल्याचं सांगितलं जात आहे.