‘वेड’साठी शर्मिला ठाकरेंनी केलं अख्ख थिएटरचं बूक

सध्या अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांचा ‘वेड’ हा चित्रपट प्रेक्षकांना अक्षरशः वेड करत आहे (movie box office). हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करुन बसला आहे. बघबघता या चित्रपटाने चांगलीच बाजी मारत अनेक रेकॉर्ड केले.

या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये इतकी क्रेझ आहे की बॉक्स ऑफिसवर(movie box office) या चित्रपटानं बक्कळ कमाई केली. प्रदर्शनाच्या दुसऱ्या रविवारी वेडने जमावला 5.70 कोटींचा गल्ला, या आकड्यासह सुपरहीट सैराटचा विक्रम मोडला. ‘वेड’ या सिनेमाने आतापर्यंत 33.42 कोटींची कमाई केली आहे. वेड चित्रपटाबाबत अजुन एक माहिती मिळाली आहे.

‘वेड’ चित्रपट पाहण्यासाठी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना तर सगळं थिएटर बूक केलं. शर्मिला ठाकरे या रितेश देशमुख, जेनेलिया यांच्यासोबत एकत्र दिसले.

यावेळी बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की त्यांना खुप आनंद झाला. ते नेहमी भेटत असतात. जेनेलियाचं दहा-बारा वर्षांपूर्वी लग्न झालं तिला आता दोन मुले आहेत मात्र तिच्या चेहऱ्यावर असं कुठचं दिसत नसल्याचं त्या म्हणाल्या. जेनेलिया ही खूप सुंदर आणि उत्तम अभिनेत्री आहेत. तिनं पुन्हा अभियनाकडं वळावं ते नेहमीच तिला सांगत असायच्या. असं त्या म्हणाल्या. शर्मिला ठाकरे म्हणाल्या, ‘रितेशने चित्रपट पाहण्यासाठी मला वेळ मागितला. मी थिएटरचं बूक केलं.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

यावर यावेळी रितेश देशमुखनेबा त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणतो की, ‘चित्रपट हा माझा किंवा तुमचा असा नसतो. ही एक इंडस्ट्री आहे. ठाकरे यांनी इंडस्ट्रीला आपलं मानल आहे. ती भावना सर्वांनी पुढं नेली पाहिजे. वेड हा प्रेक्षकांचा चित्रपट आहे. तो मोठा होत असेल तर प्रेक्षकांमुळं होतोय. प्रेक्षक थिएटरमध्ये येतात. त्यांना चांगले चित्रपट देण्याची जबाबदारी आमची आहे’ अशा भावना त्याने व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा :