शहनाज गिल वर नाराज झाले चाहते

‘बिग बॉस 13’ मुळे घराघरांत पोहचलेली अभिनेत्री म्हणजे शहनाज गिल. अगदी कमी (the van) कालावधीत शहनाजनं सगळ्यांची मनं जिंकली. बिग बॉसमधून बाहेर आल्यापासून शहनाज सतत चर्चेत असते. अशातच शहनाज नव्या व्हिडीओमुळे चर्चेत आली असून तिच्या कृतीमुळे चाहते नाराज झालं असल्याचं दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय.

शहनाजचा नवा व्हिडिओ समोर आल्यापासून सोशल मीडियावर लोक तिला ट्रोल (the van) करत आहेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये शहनाज सेटवरून तिच्या व्हॅनकडे जाताना दिसत आहे. यादरम्यान पापाराझी तिला कशी आहे विचारतात. यावर ती म्हणते मी आत्ता बिझी आहे, मी कामात आहे. पुढे शहनाज म्हणाली की, ‘मी बरी नसले तरी तुम्ही औषध देणार आहात का?’. तिच्या या उद्धटपणामुळे चाहते तिच्यावर नाराज झाले आहेत.


‘लूक अॅटिट्यूड, पहिला अॅटिट्यूड नव्हता आता बॉलिवूडमध्ये आल्यावर लगेच अॅटिट्यूड आला, बकवास, व्हेरी रुड, किती बदलली आहे’, अशा अनेक प्रकारच्या कमेंट या व्हिडीओवर येताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून शहनाजला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by instabuzz (@instabuzz09)

दरम्यान, शहनाज गिल सध्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात ती सलमान खानसोबत दिसणार आहे. यापूर्वी चित्रपटाचे नाव ‘कभी ईद कभी दिवाळी था’ असं होतं. तिचे चाहते तिच्या बॉलिबूड पदार्पणासाठी खूप उत्सूक आहेत. त्यामुळे शहनाज तिच्या अभिनयानं प्रेक्षकांचं मन जिंकेल की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Smart News :