‘शेर शिवराज’ चा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी!

छत्रपती शिवाजी महाराजांची अफजल खानाशी गळाभेट, अफजलखानाचा फसलेला कट आणि महाराजांनी वाघनखांनी केलेला अफजल खानाचा वध…, इतिहासातील ही अत्यंत महत्त्वाची घडामोड पडद्यावर पाहताना अंगावर काटा येतो. आम्ही बोलतोय ते ‘शेर शिवराज’ या दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित चित्रपटाबद्दल. सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. नुकताच प्रदर्शित झालेला हा सिनेमा सध्या गर्दी खेचतोय. बहुतेक सर्व शो हाऊसफुल आहेत. दोनच दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (box office) जोरदार मुसंडी मारली आहे.
नुकतंच या चित्रपटाच्या कमाईचे आकडे समोर आलेत. शुक्रवारी 22 एप्रिलला ‘शेर शिवराज’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. ‘केजीएफ 2’ आणि ‘जर्सी’ या मोठ्या सिनेमांचं आव्हान असतानाही या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरीव कामगिरी केली आहे. महाराष्ट्रातील 60 टक्के सिनेमागृहांत हा चित्रपट हाऊसफुल सुरू आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने कोट्यवधीची कमाई केली आहे.(box office)
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या दिवशी ‘शेर शिवराज’ने 1.05 कोटींचा गल्ला जमवला. काल शनिवारी आणि आज रविवारच्या कमाईचे आकडे अद्याप समोर आलेले नाहीत. पण प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद बघता, हा शो चांगली कमाई करत कोटींपार कमाई करेल, असा विश्वास आहे.
फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड या चित्रपटानंतर शिवराज अष्टकातील ‘शेर शिवराज’ हा चौथा सिनेमा आहे. फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड यातिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवरचांगली कमाई केली होती. दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर हे छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारी श्री शिवराज अष्टक ही मालिका घेऊल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘फर्जंद’ हा या अष्टकामधील हा पहिला चित्रपट होता. त्यानंतर फत्तेशिकस्त आणि पावनखिंड हे दोन सिनेमे आले होते. यानंतर आता ‘शेर शिवराज’ हा चौथा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
हेही वाचा :