शिल्पा शेट्टीच्या कुटुबीयांच्या अडचणी पुन्हा वाढल्या

fraud

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी मागच्या काही काळापासून सातत्यानं काही ना काही कारणानं चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वीच तिचा पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाली होती. तो अलिकडेच जामिनावर तुरुंगातून बाहेर आला आहे. अशात आता शिल्पाच्या आईच्या विरोधात अंधेरी न्यायालयानं जामीनपत्र वॉरंट जारी केलं आहे. दरम्यान महानगर दंडाधिकारी आर आर खान यांनी या आधी शिल्पा शेट्टी, तिची बहीण शमिता शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टी यांच्या विरोधात फसवणूकीच्या (fraud) प्रकरणात समन्स बजावले होते.

शिल्पा शेट्टी आणि तिच्या कुटुंबीयांनी सत्र न्यायालयात या समन्सला आव्हान दिले होते. सोमवारी यावर न्यायाधीश ए झेड खान यांनी शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टी यांच्या विरोधात महानगर दंडाधिकारी यांनी दिलेल्या आदेशला स्थगिती दिली. मात्र शिल्पाच्या आईला या प्रकरणात दिलासा मिळालेला नाही. शिल्पा शेट्टीचे दिवंगत वडील सुरेंद्र शेट्टी आणि सुनंदा शेट्टी त्यांच्या कंपनीमध्ये भागीदार होते. मात्र त्यांच्या मुली शमिता आणि शिल्पा यात भागीदार होत्या याचा कोणताही पुरावा नाही. तसेच या कर्जाशी त्यांचा काहीही संबंध असल्याचं समोर आलेलं नाही असं यावेळी न्यायालयानं सांगितलं.

आपल्या तक्रारीत एका व्यावसायिकाने आरोप केला होता (fraud)  की, सुरेंद्र शेट्टी यांनी २०१७ साली व्याजासह रक्कम परत करायची होती. तक्रारीत त्यांनी म्हटलंय की, ‘शिल्पा, शमिता आणि सुनंदा शेट्टी यांनी २०१५ सालापर्यंत आपल्या वडिलांनी घेतलेलं कर्ज चुकवलेलं नाही. शिल्पाच्या वडिलांनी या व्यावसायिकाकडून वयाच्या १८ व्या वर्षी प्रतिवर्ष व्याजाच्या हिशोबाने कर्ज घेतलं होतं. मात्र वडिलांच्या पश्चात हे कर्ज फेडण्यास शिल्पा, शमिता आणि त्यांच्या आईने नकार दिला.’ असा आरोप या व्यावसायिकानं केला होता.

दरम्यान शिल्पा शेट्टी आणि तिचं कुटुंब सातत्यानं काही ना काही कारणाने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले पाहायला मिळत आहेत. काही काळापूर्वीच शिल्पाच्या पतीला पॉर्न फिल्म तयार केल्याप्रकरणी अटक झाली होती. हे प्रकरण त्यावेळी प्रचंड गाजलं होतं. एवढंच नाही तर अनेक अभिनेत्री तसेच मॉडेल यांनी राज कुंद्राच्या विरोधात आवाज उठवला होता. तसेच त्याच्यावर गंभीर आरोपही करण्यात आले होते.


हेही  वाचा :


कोल्हापूर मध्ये घडली अत्यंत क्रूरदायक घटना..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *