बॉलिवूडला हादरा ! प्रसिध्द अभिनेत्रीच निधन..!

बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ‘गोलमाल’ फेम अभिनेत्री मंजू सिंग यांनी वयाच्या 73 वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्यामुळे कलाविश्वात एक मोठी पोकळी तयार झाली आहे. गुरुवारी त्यांचं मुंबईत निधन झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. मंजू सिंग यांच्या निधनाने गीतकार, अभिनेता आणि दिग्दर्शक स्वानंद किरकिरे यांना दु:ख झाले आहे.(Bollywood)

स्वानंद किरकिरे यांनी मंजू यांचा एक फोटो शेअर करत दुःख व्यक्त केलं आहे. ते म्हणाले, ‘मंजू सिंग राहिल्या नाहीत! दूरदर्शनसाठी ‘स्वराज’ कार्यक्रम लिहिण्यासाठी मंजूजींनी मला दिल्लीहून मुंबईत आणले!'(Bollywood)

ते पुढे म्हणाले, ‘त्यांनी डीडीसाठी एक कहानी, शो टाईम इत्यादी अनेक अप्रतिम शो केले. हृषीकेश मुखर्जीच्या गोलमाल सिनेमातील रत्ना… तुमचं प्रेम आम्ही कसं विसरू शकतो… अलविदा!” सध्या किरकिरे यांचं ट्विट चर्चेत आहे.

मंजू यांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी देखील भावना व्यक्त केल्या “मंजू सिंग यांचे निधन झाल्याची माहिती देताना आम्हाला खूप दुःख होत आहे. त्या एक सुंदर आणि प्रेरणादायी जीवन जगल्या. ‘मंजू दीदी’ ते ‘मंजू नानी’ त्यांचा हा प्रवास कायम स्मरणार राहिल….

हेही वाचा :


बडे लोग…बडी बाते…लग्नात रणबीरकडे इतक्या कोटींची मागणी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *