बॉयफ्रेंडच्या वाढदिवसाला श्रृती हासनची भावनिक पोस्ट..!

shruti haasan

अभिनेत्री श्रुती हासन(shruti haasan) एक अप्रतिम अभिनेत्री आहे. अलीकडेच ती बेस्टसेलर या वेब सीरिजमध्ये दिसली. ज्यामध्ये तिच्या कामाचं खूप कौतुक झालं. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती वैयक्तिक आणि प्रोफेशनल जीवनाशी संबंधित गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. आज साऊथ एक्ट्रेस श्रुती हासनचा बॉयफ्रेंड शंतनू हजारिकाचा वाढदिवस आहे.

अभिनेत्रीने त्याचा हा क्षण खास करण्यासाठी खास पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. श्रुती हसनने (shruti haasan)बॉयफ्रेंड शंतनू हजारिकाला तिच्या आयुष्यातील देवदूत म्हटलं आहे. श्रुती हासनने त्याच्यासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या खास दिवशी श्रुती हसन शंतनूवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. फोटोत दोघंही खूप क्यूट दिसत आहेत. चाहत्यांनाही त्यांची ही क्यूट स्टाइल आवडली आहे. या फोटोंवर चाहते लाईक कमेंट्स कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. अनेकदा ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. नुकतंच आस्क मी एनीथिंग सत्रादरम्यान श्रुती हसनने चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत तिचा बॉयफ्रेंड शंतनू हजारिकासोबतच्या नात्याबद्दल सांगितलं.अभिनेत्री श्रुती हासन ही हिंदी आणि दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते कमल हासन आणि सारिका यांची मुलगी आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, श्रुती हासन नुकतीच बेस्टसेलरमध्ये दिसली. श्रुती एक अभिनेत्री आणि गायिका असून ती तेलुगु, तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करते. बालकलाकार म्हणून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली. 2009 मध्ये आलेला ‘लक’ हा तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता. ती डी-डे, रमैया वस्तावैया, अॅक्शन फिल्म गब्बर इज बॅक आणि अॅक्शन कॉमेडी वेलकम बॅक यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये दिसली.

हेही वाचा :


इचलकरंजीत विद्यार्थी उतरले रस्त्यावर वाचा नेमकं प्रकरण काय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *