गर्लफ्रेंड सोडून दुसऱ्याच अभिनेत्रीच्या मागे गेला सिद्धार्थ मल्होत्रा..

siddharth malhotra handling dress

अभिनेत्रीने असा आउटफिट परिधान केला होता की, तिला तो ड्रेस संभाळण्यासाठी अनेकांना बोलवावं लागलं, एवढंच नव्हेतर अगदी क्रितीला मदत करण्यासाठी सिद्धार्थ मल्होत्रादेखील अभिनेत्रीच्या मदतीसाठी ​​धावून गेला. आणि तिचा ड्रेस (dress) मागून पकडून फोटोसाठी पोज देवू लागला. या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हॅलो हॉल ऑफ फेम अवॉर्ड्स 2022 मध्ये सेलिब्रिटींचा ओघ होता. या पुरस्कार सोहळ्यात एकापेक्षा एक अभिनेते आणि अभिनेत्रींनी हजेरी लावली. दरम्यान, क्रिती आणि सिद्धार्थचे फोटो आणि व्हिडिओ हेडलाईन्समध्ये आले. लॅव्हेंडर कलरमध्ये क्रितीचा मोठा ड्रेस (dress) पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं.

हा ड्रेस संभाळण्यासाठीही अनेकांची गरज भासत होती आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी सिद्धार्थही तिच्या मदतीला पोहोचला आणि ड्रेस संभाळत फोटो काढू लागला. दुसरीकडे, कियाराही या अवॉर्ड नाईटमध्ये पोहोचली आणि तिनेही पिवळ्या रंगाचा सुंदर गाऊन घातला होता पण कियाराला पापाराझींसमोर एकटीला पोज द्यावी लागली. कारण सिद्धार्थ मल्होत्रा ​​क्रितीसोबत फोटोसाठी पोज देत होता.

कियारा आणि सिद्धार्थ भलेही या एवॉर्ड नाईटमध्ये वेगवेगळे आले होते, मात्र घरी परततेवेळी हे दोघं एकत्र स्पॉट झाले. दोघंही एकाच कारमधून एकत्र जाताना दिसले. जशी कियारा कारकडे पोहचते तसा सिद्धार्थ मोठ्या-मोठ्याने ओरडू लागतो. ड्राइवर कुठे आहे? खोल ना बाबा. काय करतोयेस.’ हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


हेही वाचा :


कोरोना पुन्हा येतोय; 2 शहरांमध्ये लावले कठोर निर्बंध


कायदयाचा धाक आम्हाला दाखवू नका – फडणवीस


रहाणे आणि पुजारापाठोपाठ अजून एक खेळाडू होणार संघातून बाहेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *