नडला की तोडला ! माकडाच्या नादी लागला अन्…

Smart News:- सोशल मिडीयावर सध्या खूप मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. याच व्हिडीओमुळे आपला दिवस सुखाचा जातो. असाच एक मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. यामध्ये आपल्याला एक तरुण मुलगा पिंजऱ्यात बंद केलेल्या माकडाची छेड काढतो आणि त्यानंतर माकड त्याचा बदला घेताना आपल्याला दिसतं.
या व्हिडीओमध्ये आपल्याला एक पिंजरा दिसत आहे. त्यामध्ये एका माकडाला बंद करण्यात आलेलं आहे. तिथे फिरण्यासाठी आलेल्या एका तरुणाने त्याची छेड काढली आणि त्या माकडाने त्याला प्रत्युत्तर देत त्याचे केस ओढताना आपल्याला दिसत आहे. बराच वेळ हा प्रकार आपल्याला पहायला मिळतो. माकडाची छेड काढल्यामुळे त्याचा रागही आपल्याला माकडाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया यावर पहायला मिळत आहेत. दरम्यान काही लोकांनी प्राण्यांना विनाकारण त्रास देऊ नये असाही सल्ला दिलाय.
View this post on Instagram
प्राणी कधी कुणाची स्वत:हून खोड काढत नाहीत पण आपण जर त्यांची खोड काढली तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील हे नक्की. हा व्हिडिओ cutepetswild या इंस्टाग्राम पेजवरुन पोस्ट करण्यात आलेला आहे. या व्हिडिओला सध्या २५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
Smart News:-
मुंबई इंडियन्सची बॉलिंग ‘फॅक्ट्री’, इकडे गेलेला फॉर्म परत मिळेल!
अंडी खाण्याच्याबाबतीत ही चूक कधीही करू नका; किडनी खराब होण्याचं कारण ठरू शकतं
ठाकरे सरकारवर सातत्याने तोफ डागणाऱ्या खासदार नवनीत राणांना वाय प्लस सुरक्षा
फक्त 300 च्या EMI वर घरी घेऊन या Smart Inverter;