रूपाली भोसलेची ऑनस्क्रीन सासऱ्यांसाठी खास पोस्ट…

Smart News:-'यांच्यासाठी वय एक फक्त...' रूपाली भोसलेची ऑनस्क्रीन सासऱ्यांसाठी खास पोस्ट

Smart News:- आई कुठे काय करते मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकरांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसतात. सोशल मीडियावर यांचा विशिष्ट चाहता वर्ग आहे.

या मालिकेत आप्पांची भूमिका साकरणारे अभिनेते किशोर महोबोले यांचा आज वाढदिवस आहे. चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यानिमित्त मालिकेत संजनाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रूपाली भोसलेनं (Rupali Bhosle) आप्पांसाठी खास पोस्ट लिहिली आहे. रूपाली भोसलेनं अभिनेते किशोर महोबोले यांच्यासोबतचे काही फोटो शेअर करत म्हटलं आहे की, आम्ही एकमेकांना जवळपास 14/15 वर्षे झाली ओळखत आहे.

या तरुणाकडं एक सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे सातत्य, सदैव हसतमुख चेहरा आणि सकारत्मकता.. यांच्यासाठी वय एक फक्त एक नंबर आहे. आणि हो त्यांनी ते वेळोवेळी सिद्ध देखील केलं आहे. @kishormahabole KISHU एसे चमकत राहा.

अशीच सकारात्मक उर्जा पसरवत राहा आणि तुमच्यातील लहान मुलाला असच जिवंत ठेवा.. ❤️ I love you aaapppppaaaaa ❤️..रूपालीनं या पोस्टच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा तर दिल्याच आहेत शिवाय त्यांच्याविषयी असलेला आदर व प्रेम देखील व्यक्त केलं आहे. अरुंधतीला उत्तम स्वयंपाक येतो पण मधुराणीचं काय? त्यासाठी हा Video नक्की पाहा!

संजना आणि आप्पाचं मालिकेत जरी पटत नसले तर सेटवर मात्र ही जोडी चांगलीच धमाल करताना दिसते. मालिकेत नेहमी एकमेकांना विरोध करणाऱ्या य़ा दोघांची खऱ्या आयुष्यात तितकीच घट्ट मैत्री आहे.

किशोर महाबोले हे गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. पवित्र रिश्ता या लोकप्रिय हिंदी मालिकेत त्यांनी अर्चनाच्या वडिलांची मनोहर करंजकर यांची भूमिका साकारली होती. तसेच स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून फिरंगोजी यांची व्यक्तिरेखा साकारली होती. सुलतान शंभू सुभेदार, मी शिवाजी पार्क, बस्ता, कुंकू झाले वैरी, आई शप्पथ, सखी, द लेजंड ऑफ भगतसिंग अशा बॉलिवूड तसेच मराठी चित्रपटात त्यांनी सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिका साकारल्या आहेत.

 

Smart News:-

फोटो पाहून तरुणाने केलं लग्न; चेहऱ्यावरील ओढणी हटवताच हादरला


शहनाज गिलच्या ऑफ शोल्डर टॉपमध्ये घायाळ करणाऱ्या अदा


राज्यातील 70 लाख शेतकऱ्यांना फटका


शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्‍यावर शाईफेक


राजस्थान-गुजरात फायनल होती ‘फिक्स’?

Leave a Reply

Your email address will not be published.