Smart News:- भारतात हनिमूनसाठीअनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत. परंतु अनेकदा लोकांना हनिमूनसाठी परदेशात जायची इच्छा असते. जर तुम्हीही तुमच्या जोडीदारासोबत परदेशात हनिमूनसाठी बजेटमधील ठिकाणं शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी अशाच 5 जागा घेऊन आलो आहोत जिथे तुम्ही तुमचा हनिमून स्वस्तात साजरा करू शकता. चला तर मग जाणून घेऊया.
1) नेपाळ (Nepal)- नेपाळला भेट देण्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे येथे पोहोचण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ प्रवास करावा लागत नाही. तिथे तुम्ही फ्लाइट आणि ट्रेनने पोहोचू शकता. ट्रेनमधून उतरल्यानंतर तुम्हाला नेपाळ सीमेवर जावे लागते आणि त्यानंतर तुम्हाला बस किंवा कॅब तिथून सहज उपलब्ध होते. भारतीय लोकांना येथे जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही. नेपाळ हे सुट्ट्यांपासून हनिमूनपर्यंत एक बजेट फ्रेंडली डेस्टिनेशन आहे. येथे तुम्ही ट्रेकिंगसोबतच अनेक साहसी खेळ करू शकता. येथे व्हिसा आवश्यक नाही परंतु तुम्हाला भारतीय पासपोर्ट दाखवावा लागेल.
२) भूतान (Bhutan)- बजेट फ्रेंडली हनीमूनसाठी भूतानचे वातावरण चांगले आहे. हा देश भारतापासून जवळ आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ उड्डाण करावे लागणार नाही. येथे तुमचा हनिमून बजेटमध्ये पूर्ण होऊ शकतो. यासह, भूतानमध्ये करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत आणि आपल्या जोडीदारासह निसर्गाच्या सौंदर्याचा साक्षीदार होणे ही एक उत्तम गोष्ट आहे. इथे जाण्यासाठी तुम्हाला व्हिसाचीही गरज नाही, फक्त एक भारतीय पासपोर्ट आणि ओळखपत्र सोबत ठेवा.
3) इंडोनेशिया (Indonesia)- इंडोनेशियामध्ये हनीमूनसाठी अशी अनेक बेटे आहेत जी हनीमूनसाठी बजेट फ्रेंडली आहेत. या बेटांवर, तुम्हाला अनेक बजेट फ्रेंडली हॉटेल्स देखील सहज मिळू शकतात. इथे जाण्यासाठी व्हिसा ऑन अरायव्हल आहे, ज्यासाठी तुम्हाला काही रुपये देखील द्यावे लागतील. येथे तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक ड्राईव्ह, थाई मसाज, बीच अॅक्टिव्हिटी करायला विसरू नका.
4) श्रीलंका (Sri Lanka)- हनिमूनसाठी श्रीलंका हे आशियातील सर्वोत्तम ठिकाण आहे. येथे बौद्ध मंदिरांसारखे खूप काही पाहण्यासारखे आहे, यासोबतच तुम्ही येथील स्वादिष्ट खाद्यपदार्थ चुकवू शकत नाही. श्रीलंका हे एक बजेट हनिमून डेस्टिनेशन आहे जे प्रवाशांसाठी देखील सर्वोत्तम असू शकते. येथे जाण्यासाठी तुम्ही ३० दिवसांचा व्हिसा ऑनलाइन घेऊ शकता. येथे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत भरपूर आनंद घेऊ शकता. परंतु श्रीलंकेत सध्या सुरु असलेल्या आर्थिक संकटामुळे तेथे जाणे टाळावे.
5) सेशेल्स (Seychelles)- हे ठिकाण लोकांपासून लपलेले असले तरी बजेट फ्रेंडली असल्यामुळे या यादीत सेशेल्सचा समावेश झाला आहे. येथे समुद्र किनाऱ्यावरील अतिशय सुंदर आणि रोमँटिक दृश्यांचा आनंद घेता येतो. येथे जाण्यासाठी व्हिसा आवश्यक नाही, परंतु तुम्हाला भारतीय ओळखपत्र आणि प्रवासी कागदपत्रे आवश्यक असतील. इथे तुमच्या जोडीदारासोबत बीचवर सायकल चालवता येते किंवा मग सफारीला जाता येऊ शकते.