‘त्या’ एका ट्विटवरून रवीना टंडनचा राग झाला अनावर

social media post angry on ravina tandon

अभिनेत्री रवीना टंडन सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. इतकंच नव्हे तर प्रत्येक विषयावर आपलं मत खुलेपणाने मांडताना ती दिसते. नुकतंच तिने केलेलं एक ट्विट (social media post) सगळीकडे चर्चेचा विषय ठरलं होतं. यावरून तिला बरंच ट्रोल देखील करण्यात आलं. एका युजरने तर तिची तुलना थेट अभिनेत्री सोनम कपूरशी केली. यामुळे रवीनाचा राग अनावर झाला आणि पुन्हा एकदा तिने ट्विट करत ट्रोलर्सला सुनावलं आहे.

काय आहे प्रकरण?

“आम्ही सहनशील आहोत, होतो आणि राहू. भारत हा एक स्वतंत्र देश आहे, इथे कोणालाही कोणाचीही पूजा करता येते. इथे सर्वांना समान अधिकार आहेत.” अशा प्रकारचं ट्विट रवीनाने केलं होतं. या तिच्या ट्विटनंतर अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

एका युजरने ट्विट (social media post) करत म्हटलं की, “किती मुर्खासारखं ट्विट केलं आहे. भारतात ओसामा, कसाब, अफजल गुरु, यासीन मालिक, हाफिज सईद, मसीद अजहर यांची पूजा करण्याची कोणाची इच्छा असेल तर ते ठिक आहे का? कारण सहिष्णू देशात समान अधिकारांचा अर्थ असाच असतो. सोनम कपूर तुझ्यापेक्षा अधिक समजूतदार आहे.”

सोनम कपूरशी आपली केलेली तुलना पाहून रवीनाला राग अनावर झाला आणि तिने पुन्हा एकदा ट्विट केलं. ती या ट्विटमध्ये म्हणाली, “जी तुम्ही नावं सांगितली आहेत ती लोकं शैतानापेक्षा काही कमी नाहीत. खूप कमी लोकं तुम्हाला सापडतील जी शैतानाची पूजा करत असतील. ज्यांना समजायचं आहे ते समजतील आणि ज्यांना हे नाही समजलं ते समजूतदारच नाहीत.” रवीनाने हे ट्विट करत युजरला सुनावलं.

त्यानंतर त्या युजरने देखील आपलं ट्विट लगेचच काढून टाकलं. बहुदा ट्विट वरून चर्चेत आलेली रवीना सध्या प्रत्येकाला सडेतोड उत्तर देण्याच्या तयारीत आहे. एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी, खासदार इम्तियाज जलील, वारीस पठाण यांनी कार्यकर्त्यांसह खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतले. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं होतं. या वादामध्ये रवीनाने देखील सहभाग घेत ट्विट केलं होतं.


हेही वाचा :


डिप्रेशनमध्ये गेलेल्या अभिनेत्रीने जपला ‘हा’ मंत्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *