लग्नाआधी अभिनेत्री आलिया भट्टचा मोठा निर्णय;

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. आता दोघांच्या लग्नाला अवघे काही दिवस उरले आहेत. मात्र, आतापर्यंत या कपलने त्यांच्या लग्नाबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. दरम्यान, आलियाने स्वतःला घरात कैद करुन घेतलं आहे. आणि ती पापाराझींपासून लांब राहीली आहे.(social media report)

आलियाने लग्नाआधी घेतला मोठा निर्णय
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना त्यांच्या लग्नाबाबत शक्य तितक्या गोष्टी गुप्त ठेवायच्या आहेत. लग्नाची तयारीही गुपचूप सुरू आहे. एका रिपोर्टनुसार, जुहूमध्ये सगळे फोटोग्राफर्स आहेत. लग्नाशी संबंधित प्रश्न टाळण्यासाठी आलियाने पापाराझींपासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. तिने स्वतःला घरात कैद करून घेतलं आहे. आता ती लग्न होईपर्यंत पापाराझींपासून दूर राहणार आहे.

आलियाच्या काकांनी सांगितली लग्नाची तारीख
रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या तारखेबाबत बराच गोंधळ आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये (social media report) लग्नाची तारीख वेगळी सांगितली जात आहे. मात्र अलीकडेच आलियाच्या काकांनी लग्नाची तारीख कंन्फर्म केली आहे.

हेही वाचा :


गृहमंत्री वळसे-पाटील यांची उचलबांगडी?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *