सोमी अलीचे सलमानवर गंभीर आरोप…!

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचं(salman khan instagram) नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. त्यातीलच एक नाव म्हणजे सोमी अली. नव्वदच्या दशकात सलमानने सोमीला डेट केल्याचं म्हटलं जातं. मात्र ब्रेकअपनंतर ती अमेरिकेला राहायला गेली. मात्र तिने सलमानवर अनेकदा गंभीर आरोप केले होते. सोमी अली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

यावेळी तिने सलमान खानसोबतचा(salman khan instagram) तिचा जुना फोटो शेअर करत पुन्हा एकदा सलमानवर निशाणा साधला आहे. सोमी अलीने सलमान खानवर मारहाणीचा आरोप केला आणि काही वेळाने तिची पोस्ट हटवली. इतकेच नाही तर सोमी अलीने सलमान खानला सपोर्ट करणाऱ्या अभिनेत्रींवरही चांगलाच हल्ला चढवला आहे.

सोमी अलीने सलमान खानसोबतचा एक जुना फोटो शेअर करत लिहिले की, अजून बरचं काही व्हायचं आहे. माझा शो भारतात बंद करण्यात आला आणि त्यानंतर वकिलांनी मला धमक्या दिल्या. तू भित्रा माणूस आहेस माझ्या रक्षणासाठी 50 वकील उभे राहतील, जे मला सिगारेट चे चटके आणि वर्षानुवर्षे माझ्यावर होणाऱ्या शारीरिक अत्याचारापासून मला वाचवतील.

salman khan instagram

 

पुढे सोमी अलीने अभिनेत्रींवर निशाणा साधत म्हटलंय की, त्या सर्व अभिनेत्रींना आणि त्या कलाकारांनीही लाज वाटली पाहिजे ,महिलांवर अत्याचार करणाऱ्या पुरुषाचे समर्थन केले आहे. आता हा अटी तटीची लढाई आहे. सोमीची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली . मात्र, काही वेळातचं तिने ही पोस्ट डिलिट केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Somy Ali (@realsomyali)

सोमी अलीने सलमानवर आरेप करण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपुर्वीही मैने प्यार कियाचे पोस्टर शेअर करत तिने लिहिले की, त्यांची पूजा करणं बंद करा. यासोबतच तिने सलमान खानचे नाव न घेता त्याच्यावर मारहाणीचा आरोपही केला होता. सोमी अली आणि सलमान खान 90 च्या दशकात रिलेशनशिपमध्ये होते. दोघेही अनेक जाहिरातींमध्ये एकत्र दिसले होते. पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि ती अमेरिकेत शिफ्ट झाली.

हेही वाचा :