सोनाक्षी सिन्हाचं ठरलं…एगेंजमेंटचे फोटो सोशल मीडियावर शेअर…

बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ते पाहून तिच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.सोनाक्षीने एंगेजमेंटचे (engagement) फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोनाक्षीने तिच्या आयुष्यातील ही मोठी आनंदाची बातमी तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सोनाक्षीच्या एंगेजमेंटच्या बातमीने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

सोनाक्षीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तीन वेगवेगळे फोटो शेअर करून तिच्या एंगेजमेंटची (engagement) बातमी दिली आहे. दबंग गर्ल सोनाक्षी तिच्या एंगेजमेंट रिंगसह फोटोत दिसत आहे… या फोटोमध्ये दबंग गर्ल सोनाक्षी तिची एंगेजमेंट रिंग फ्लॉंट करताना दिसत आहे.

फोटोत सोनाक्षीच्या फिओन्सेने तिचा हात धरल्याचं दिसत आहे. मात्र, सोनाक्षीचा प्रेमळ जोडीदार कोण यावर सस्पेंस कायम आहे, कारण सोनाक्षीने फोटोंमध्ये तिच्या जोडीदाराचा चेहरा उघड केलेला नाही.

दुसऱ्या फोटोमध्ये सोनाक्षी तिच्या प्रिय जोडीदाराच्या खांद्यावर हात ठेवून पोज देताना दिसत आहे. सोनाक्षी तिच्या जोडीदाराचा हात धरून हसत आहे.

ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर करताना सोनाक्षीनं लिहिलंय की, हा माझ्यासाठी मोठा दिवस आहे. माझं एक सर्वात मोठं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि ते तुमच्या सर्वांसोबत शेअर करण्यापासून मी स्वतःला थांबू शकत नाही…

अभिनेत्रीने जोडीदाराचे नाव उघड केलं नाही मात्र हा लकीबॉय दुसरा कोणी नसून ‘नोटबुक’ फेम अभिनेता झहीर इक्बाल आहे…. सोनाक्षी आणि झहीरच्या डेटिंगच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होत्या. बऱ्याच दिवसांपासून दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याच्या बातम्या येत आहेत

दोघांनीही डेटिंगच्या वृत्ताला दुजोरा दिला नाही. मात्र फोटोमधील सोनाक्षीचा जोडीदार झहीर इक्बाल आहे की आणखी कोणी, हेही लवकरच कळेल.

हेही वाचा :


चेन्नईच्या विजयानंतर MS DHONI नाराज, नेमकं काय कारण?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *