सोनाक्षी सिन्हा बनली जलपरी, पाहा दिलकश अदा..!

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून आपले अपडेट (social media updates) चाहत्यांना शेअर करत असते. सोनाक्षीचे सध्या मालदीवच्या बीचवर हॉलिडे एन्जॉय करताना दिसली आहे. तिच्या इथल्या फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावरील काही फोटो शेअर (social media updates) केले आहेत. या फोटोत सोनाक्षीचा हॉट आणि परफेक्ट लूक पाहायला मिळत आहे. यावेळी ती समुद्राच्या पाण्यात जलपरी बनून मौजमस्ती करताना दिसली. यावेळी तिने पांढऱ्या रंगाच्या बिकिनी टॉप आणि शॉर्ट्समध्ये हॉट पोझ दिली आहे. तर तिने मोकळ्या केसांसह लाइट मेकअपने आपला लूक पूर्ण केला आहे. सोनाक्षीचा हा लूक चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘Mermaid spotting 🧜🏼‍♀️ मालदीवच्या बीचशी असलेले प्रेम आणखीण घट्ट होत आहे.’ असे म्हटले आहे. यावरून सोनाक्षी मालदीवमध्ये मनमुराद समुद्राच्या पाण्याचा आनंद घेताना दिसते. सोनाक्षीची हटके स्टाईल चाहत्यांना खूपच आवडली आहे. याशिवाय तिने शेअर केलेल्या एका फोटोत समुद्राच्या बीचवर बसलेली दिसत आहे.

 

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यानी कॉमेन्टसचा पाऊस पाडला आहे. यात एका युजर्सने Beautiful❤️❤️, Hot 🔥🔥, ‘Peace perfect pretty girl 🔥❤️❤️’. तर दुसऱ्या एका युजर्सने ‘हॉट’, ‘ग्लॅमरस’, ‘क्यूट’ असे म्हटले आहे. आणखी एका युजर्सने तिला पाण्यातील जलपरी असे म्हटले आहे. याशिवाय काही चाहत्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. सोनाक्षीचे इन्स्टाग्रामवर २१ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सोनाक्षी सिन्हा आगामी ‘इत्तेफाक’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे, ज्यामध्ये सोनाक्षीसोबत सिद्धार्थ मल्होत्रा ​​मुख्य भूमिकेत असणार आहे. याशिवाय सोनाक्षीकडे इतरही अनेक चित्रपट आहेत.

हेही वाचा :


शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *