पैसे नसल्याने बेघर झालेला तरुण; अचानक जुन्या बँक अकाऊंटबद्दल समजलं अन् आयुष्यच बदललं

bank account
कोणाचं नशीब कधी बदलेल हे कोणीच सांगू शकत नाही. अनेकदा जो आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करत असतो, तो अचानक सगळ्या समस्यांवर मात करतो आणि आपलं आयुष्य बदलून टाकतो.

अलीकडेच ब्रिटनमधील एका तरुणासोबत असंच घडलं. ज्याचं आयुष्य गरिबीत जात होतं आणि तो बेघर झाला होता. परंतु, असं म्हणतात की ‘बुडणाऱ्याला काडीचा आधार’. या व्यक्तीसोबतही असंच घडलं आणि अचानक त्याला त्याच्या एका जुन्या बँक अकाऊंटची(bank account) माहिती मिळाली.

या चित्रात तुम्हाला किती घोडे दिसतात? संख्येवरून कळेल तुमचा स्वभाव, लगेच पाहा डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, 25 वर्षीय ब्रँडन मार्बेक्स वयाच्या 22 व्या वर्षापर्यंत बेघर होता. त्याला राहायला जागा नव्हती आणि तो गरिबीत आयुष्य काढत होता. एक वेळ अशी आली की त्याच्याकडे असलेले सर्व पैसे संपण्याच्या मार्गावर होते.

तो पूर्णपणे कंगाल होणार होता, इतक्यात त्याला एका वेबसाइटवरून कळालं की त्याच्या नावावर एक जुनं बचत बँक खातं(bank account) आहे. जेव्हा तो फक्त 10 वर्षांचा होता, तेव्हा त्याचं एक लहान मुलांसाठीचं बँक खातं नॅटवेस्टद्वारे उघडलं गेलं होतं. काही वर्षांनी कुटुंबीय त्याबद्दल विसरले. त्यांना वाटलं की ते खातं बंद झालं आहे आणि आता त्यांना त्याचा अॅक्सेस मिळणार नाही.

ब्रँडनचं भविष्य डोळ्यासमोर ठेवून त्याच्या पालकांनी ते खातं उघडलं होतं. पण खातं उघडल्यानंतर 12 वर्षांनी जेव्हा ब्रँडनला बेघर होण्याची वेळ आली होती, तेव्हा त्याने ठरवलं की आपण ते खातं शोधण्याचा प्रयत्न करू. अचानक ब्रँडनला त्या अकाऊंटबद्दल वेबसाईटवरून कळालं, तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला.

त्याच्यासाठी हे खातं आशेचा किरण बनून आलं होतं. खात्यात सुमारे 28 हजार रुपये होते. मिरर वेबसाइटशी बोलताना ब्रँडनने सांगितलं की, त्याची आई दर महिन्याला 10 पौंड म्हणजेच सुमारे 950 रुपये खात्यात टाकत असे. आईने अनेक वर्षे हे केलं आणि हेच पैसे इतके वाढले की ब्रँडनला यामुळे बेघर राहावं लागलं नाही. हे पैसे मिळण्यासाठी त्याला सुमारे 4 महिने लागले, परंतु त्या पैशातून त्याने भाड्याच्या घराची डिपॉझिट रक्कम दिली.

Smart News:-

पुणेकराने १ हजार किल्ल्यांवरील दगड केले गोळा; तरुणाच्या कर्तृत्वाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद


मांजरीचे पिल्लू समजत बिबट्याच्या बछडांना खेळवले, 5 दिवसांनी झाला उलगडा


तरुणीने चित्त्याला असं किस केलं जणून काही मांजरीलाच किस करतेय, पण पुढे घडलं भलतंच


सनी देओलचा मुलगा करणची झाली एंगेजमेंट, या कारणामुळे करतोय लवकर लग्न!


Leave a Reply

Your email address will not be published.