Power Rangers फेम अभिनेत्याचं 49 व्या वर्षी संपवलं जीवन

ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सूम  यांच्या निधनाची बातमी ताजी असताना चाहत्यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पॉव्हर रेंजर (Power Rangers) स्टार जेसन डेविड फ्रैंक  चं निधन झालं आहे. रिपोर्टनुसार अभिनेत्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. जेसनच्या आत्महत्येचं कारण  अद्याप समोर आलेलं नाही. फ्रँक्स ऑन द पॉवर रेंजर्सचे कलाकार वॉल्टर ई. जोन्स यांनी इंस्टाग्रामवर जेसनच्या निधनाची माहिती दिली आहे.

जेसनच्या (power rangers) निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. जेसनच्या निधनाची बातमी कळताच सोशल मीडियावर चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेत्याच्या निधनामुळे फक्त कुटुंबालाच नाही तर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

जेसनच्या निधनानंतर कुटुंबातील एका सदस्याने शोक व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्याचा एजंट, जस्टिन हंट यांनी सांगितलं, या कठीण वेळी त्याच्या कुटुंबाच्या आणि मित्रांच्या गोपनीयतेचा आदर करणं महत्वाचे आहे. त्यानं आपलं सर्वस्व मित्रांसाठी आणि चाहत्यांसाठी दिलं. त्याची कमतरता कायम भासेल…

पॉव्हर रेंजर मालिकेचा पहिला सीझन

28 ऑगस्त 1993 रोजी प्रदर्शित झालेल्या सीजनमध्ये जेसनने टॉमी ओलिव्हरच्या भूमिकेला न्याय दिलं. ग्रीन रेंजर म्हणून त्याची भूमिका चौदा भागांनंतर संपली. परंतू त्याच्या चाहत्यांच्या लोकप्रियतेमुळे, त्याला व्हाइट रेंजर आणि उर्वरित मालिकेसाठी टीमचा नवीन कमांडर म्हणून परत काम देण्यात आलं.

हेही वाचा: