सकाळी रिकाम्या पोटी अभिनेत्री चहा-कॉफी नाही, तर घेतात ‘हे’ ड्रिंक्स

stomach

आपलं आरोग्य आणि सौंदर्य फक्त आणि फक्त आपल्या आहारावर अवलंबून असतं. सकस आहार घेतल्याने शरीरासोबतच त्वचाही निरोगी राहते, तर अनहेल्दी आहारामुळे त्वचेची चमक कमी होते. अशा परिस्थितीत त्वचेची निगा राखण्यासाठी आरोग्यदायी आहार किंवा पेयांचे सेवन केले पाहिजे. विशेषत: रिकाम्या पोटी (stomach) त्यांचे सेवन केल्याने चेहऱ्यावर त्याचा अधिक फायदा होतो. बॉलीवूड अभिनेत्री त्यांच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी हेल्दी ड्रिंक घेतात

अभिनेत्री अनुष्का शर्मा
अनुष्का शर्माची स्किन प्रचंड सुंदर आहे. अभिनेत्री तिच्या दिवसाची सुरुवात हळदीने करते. त्यानंतर ती लिंबूपाणी पिते. तजेलदार त्वचेसाठी तुम्ही देखील लिंबू पाण्याचेही सेवन करू शकता.

अभिनेत्री सोनम कपूर
सोनम कपूर तिच्या दिवसाची सुरुवात लिंबूपाण्याने करते. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही लिंबू पाण्याचेही सेवन करू शकता. लिंबूमध्ये व्हिटॅमिन-सी आढळते जे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.

अभिनेत्री मलायका अरोरा
वयाच्या 40 व्या वर्षी देखील मलायका प्रचंड सुंदर दिसते. मलायका देखील दिवसाची सुरूवात लिंबू पाण्याचेही सेवन करून करते. लिंबू पाण्यात व्हिटॅमिन – सी असतं. ज्याचा फायदा चेहऱ्याला होतो.

अभिनेत्री कियारा आडवाणी
कियारा देखील बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.  कियारा तिच्या दिवसाची सुरूवात हळदीच्या पाण्याने करते. शिवाय ती सकाळी रिकाम्या पोटी(stomach)गरम पाणी देखील पिते.

अभिनेत्री सारा अली खान
अभिनेत्री सारा अली खान देखील तिच्या दिवसाची सुरूवात चहा-कॉफीने नाही, तर नारळ पाण्याने करते. त्यामुळे सारा नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखली जाते.

हेही वाचा :


कोणतंही औषध घेण्याअगोदर ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या!

Leave a Reply

Your email address will not be published.