मटकीला मोड नाय, Oo Antava च्या मराठी व्हर्जनला तोड नाय!

craze

टॉलिवूडसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिच्या करिअरमधील पहिलावहिला आयटम साँग तुफान हिट झाला. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ (Pushpa) या चित्रपटातील ‘ऊ अंटावा’ (Oo Antava) या गाण्यावर तिने डान्स केला. या गाण्यात समंथाने आपल्या मादक अदांनी चाहत्यांना घायाळ केलं. अजूनही सोशल मीडियावर ‘ऊ अंटावा’ची क्रेझ (craze) पहायला मिळते. पार्ट्यांमध्येही हे गाणं वाजलं की त्याच्या हुकस्टेपवर सर्वांचे पाय थिरकतात. ‘पुष्पा’मधील हा आयटम साँग आतापर्यंत तेलुगू, हिंदी आणि तमिळ भाषेत प्रदर्शित झाला. प्रत्येक भाषेतील या गाण्याला तुफान प्रतिसाद मिळाला. मात्र आता चक्क मराठीत हे गाणं गायलं गेलं आहे. ‘ऊ अंटावा’चं मराठी व्हर्जन सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. याआधी ‘पुष्पा’मधील श्रीवल्ली या गाण्याचंही मराठी व्हर्जन सोशल मीडियावर गाजलं होतं. (Oo Antava song in marathi)

रागिनी कवठेकर यांनी हे मराठीतील गाणं गायलं आहे. ‘ऊ बोलणार की ऊ ऊ बोलणार बाळा..’, असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याला युट्यूबवर दीड लाखांहून अधिक (craze) व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी कमेंट्समध्ये मराठी व्हर्जनचं कौतुक केलं आहे. श्रीवल्ली आणि ऊ अंटावानंतर ‘सामी’ या गाण्याचंही मराठी व्हर्जन आणावं, अशी मागणी काही नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये केली आहे. ‘ऊ अंटावा’चं मराठी व्हर्जन गावं, अशी कल्पना सर्वांत आधी रागिनीलाच सुचली. डॉनी हजारिका यांनी या गाण्याचं म्युझिक मास्टरिंग केलं आहे. तर शशांक कोंदविलकर यांनी या मराठी व्हर्जनचे बोल लिहिले आहेत.

‘ऊ अंटावा’ या आयटम साँगमधील समंथाचा बोल्ड लूक, तिचा डान्स आणि त्यावरील मादक अदा पाहून चाहते अवाक् झाले होते. कारण समंथा अशा अंदाजात पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर आली. विशेष म्हणजे तिने या गाण्याला सुरुवातीला नकार दिला होता. अल्लू अर्जुनने समंथाला या गाण्याची ऑफर दिली होती. बराच वेळ विचार केल्यानंतर तिने नकार कळवला. मात्र त्यानंतरही अल्लू अर्जुनने तिला समजावलं आणि त्याच्यावर विश्वास ठेवत समंथाने ऑफर स्विकारली. या गाण्यासाठी तिने तब्बल पाच कोटी रुपये मानधन घेतल्याचं म्हटलं जात होतं. प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी या गाण्याची कोरिओग्राफी केली.

हेही वाचा :


BJP नेते रस्त्यावर कटोरा घेऊन भीक मागत आहेत का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *