हॉलिवूडलाही पछाडलं The Kashmir Files ने

the kashmir files box office collection

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाची कमाई आता 200 कोटींवर पोहोचली आहे. 11 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या अकराव्या दिवशीच या चित्रपटाने हा विक्रम रचला आहे. द काश्मीर फाईल्सची दुसऱ्या आठवड्याची कमाई (box office collection) ही थक्क करणारी आहे.

कोरोना महामारी आणि लॉकडाउननंतर प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्यात सर्वाधिक करणारा हा चित्रपट ठरला आहे. काश्मिरी पंडितांवरील (Kashmiri Pandit) अत्याचारावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाने अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’, रणवीर सिंगचा ’83’ या बॉलिवूड चित्रपटांनाच मागे टाकलं नाही. तर ‘स्पायडरमॅन’सारख्या हॉलिवूड चित्रपटालाही टक्कर दिली आहे. अजूनही या चित्रपटाचे शोज हाऊसफुल आहेत. राधेश्याम, बच्चन पांडे यांसारख्या मोठ्या चित्रपटांचाही त्यावर परिणाम झाला नाही. याउलट द काश्मीर फाईल्सचा फटका अक्षयच्या ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाला बसला आहे.

रविवारपर्यंत या चित्रपटाच्या कमाईत सतत वाढ झाल्याचं पहायला मिळालं. मात्र सोमवारच्या कमाईत 50 टक्क्यांची घट पहायला मिळाली. झी स्टुडिओजने ट्विटरवर शेअर केलेल्या पोस्टनुसार, ‘द काश्मीर फाईल्स’ने 11 दिवसांत 206.10 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. हा जगभरातील कमाईचा आकडा आहे. 11व्या दिवशी म्हणजेच सोमवारी या चित्रपटाने 13.75 कोटी रुपये कमावले. यापैकी 12.40 कोटी रुपयांची कमाई ही भारतात झाली आहे.

18 मार्च- 19.15 कोटी रुपये (box office collection)
19 मार्च- 24.80 कोटी रुपये
20 मार्च- 26.20 कोटी रुपये
21 मार्च- 12.40 कोटी रुपये

येत्या 25 मार्च रोजी एस. एस. राजामौली यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित RRR हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ज्युनियर एनटीआर, रामचरण, आलिया भट्ट, अजय देवगण यांसारख्या तगड्या कलाकारांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाचा परिणाम ‘द काश्मीर फाईल्स’च्या कमाईवर होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा :


इचलकरंजी नगरपालिकेला मोठा दणका…


चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून !


12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *