The Kashmir Filesने मोडला हा विक्रम…

box office collection of kashmir files

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाने अवघ्या आठ दिवसांत बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. आठव्या दिवशी ब्लॉकबस्टर चित्रपटाने 19.15 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 11 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 116.45 कोटी (box office collection )रुपयांचा गल्ला जमवला आहे.

द काश्मीर फाईल्सच्या आठव्या दिवसाची कमाई ही आमिर खानच्या दंगल (Dangal) या चित्रपटाच्या आठव्या दिवसाच्या कमाईपेक्षा अधिक आहे. तर ‘बाहुबली 2’पेक्षा थोडी कमी आहे. ‘बाहुबली 2’ने आठव्या दिवशी 19.75 कोटी रुपये कमावले होते. तर दंगलने 18.59 कोटी रुपये कमावले होते. काश्मिरी पंडितांचं दु:ख मांडणारा हा चित्रपट दुसऱ्या आठवड्यात 150 कोटींचा टप्पा पार करेल असा अंदाज तरण आदर्शने वर्तवला आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ने प्रदर्शनाच्या दुसऱ्या शुक्रवारी सर्वाधिक 19.15 कोटी रुपयांची (box office collection ) कमाई केली आहे. कमाईचा वाढता आकडा पाहता दुसऱ्या आठवड्यात हा चित्रपट कोणत्याही अडचणीशिवाय 150 कोटींचा टप्पा पार करू शकतो. शनिवार आणि रविवारसाठी अॅडव्हान्स बुकिंगसुद्धा चांगली झाली आहे. त्याचप्रमाणे हिंदीनंतर आता तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा चार भाषांमध्ये हा चित्रपट डब करण्यात येणार आहे.

द काश्मीर फाईल्सची कमाई-

शुक्रवार- 3.55 कोटी रुपये
शनिवार- 8.50 कोटी रुपये
रविवार- 15.10 कोटी रुपये
सोमवार- 15.05 कोटी रुपये
मंगळवार- 18 कोटी रुपये
बुधवार- 19.05 कोटी रुपये
गुरुवार- 18.05 कोटी रुपये
शुक्रवार- 19.15 कोटी रुपये
एकूण- 116.45 कोटी रुपये


हेही वाचा :


शाळेत चाललेल्या मुलीला वाटेतच मृत्यूनं गाठलं


सर जडेजामुळे या ऑलराउंडर खेळाडूचं करिअर धोक्यात…


चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य..


किरीट सोमय्यांच्या ट्विटने खळबळ…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *