The Kashmir Files वर बॉलिवूड गप्प का? – विवेक अग्निहोत्रीं

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) चित्रपट सध्या सोशल मीडियावर बराच गाजतोय. प्रेक्षक आणि समीक्षकांनीही या चित्रपटाचं खूप कौतुक केलं आहे. एवढंच नाही तर काही सेलिब्रेटींनीही या चित्रपटावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील चित्रपटाचं कौतुक केलं आहे. मात्र बॉलिवूडच्या मोठ्या आणि प्रसिद्ध कलाकारांनी यावर अद्याप मौन साधलं आहे. यावर आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांनी ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटावर प्रतिक्रिया दिलेल्या नाहीत यावर बोलताना विवेक अग्नीहोत्री म्हणाले, ‘हे गरजेचं नाही. आता देश बदलत आहे आणि पूर्वी बनवण्यात आलेले नियम आता मागे पडताना दिसतायत.
या चित्रपटात पल्लवी जोशी यांचा एक डायलॉग आहे, ‘हुकूमत कोणाचीही असो, सिस्टिम तर आमचीच आहे ना.’ पण या गोष्टी आता बदलताना दिसत आहेत. सत्य सर्वांसमोर येत आहे. काश्मीर फाइल्स हा एक सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. ही कथा बॉलिवूडची नाहीये तर काश्मीर मधील लोकांच्या संघर्षाची आहे.’
Smart News:-
सर्व्हर हॅक करून डोंबिवली नागरी बँकेची दीड कोटींची फसवणूक
Rajasthan Royals च्या खेळाडूवर अश्विन इफेक्ट….!
रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी…
Share Market मधील आर्थिक नुकसानामुळे दोघांची आत्महत्या
राज्य सरकारचा ‘द कश्मीर फाइल्स’ करमुक्त करण्यास नकार