Rashmika Mandanna च्या बनवलेल्या टॅटूचं रहस्य अखेर उघड..!

नॅशनल क्रश आणि साउथची अभिनेत्री रश्मिका (tattoos) मंदाना ने अनेकांना आपल्या अभिनयाने आणि एक्प्रेशनने भूरळ पाडली आहे. मुलांपासून अगदी मुलींपर्यंत सर्वच लोक रश्मिकाच्या वागण्या-बोलण्यापासून सगळ्याच गोष्टींचे वेड लागले आहे. रश्मिका नुकतीच पुष्पा सिनेमात श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसली. तिच्या या भूमिकेवर लोकांनी भरभरुन प्रेमाचा वर्षाव केला. या सिनेमातील गाणं श्रीवल्लीची क्रेज सर्वत्र आहे. केवळ चाहतेच नाही तर विराट कोहलीपासून ते क्रिकेटविश्वातील हार्दिक पांड्यापर्यंत पुष्पाच्या श्रीवल्ली गाण्यावर नाचताना दिसले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई केली.

रश्मिका मंदाना सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असते. येथे ती आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच काही ना काही अपडेट करत असते. चाहत्यांना देखील आपले अवडते सेलिब्रिटी आपल्या आयुष्यात काय करतात? हे जाणून घ्यायला आवडते.

बऱ्याच दिवसापासून रश्मिका मंदानाच्या टॅटूची सर्वत्र सुरु आहे.. ज्यामुळे हा टॅटू (tattoos) तिने का काढला आणि तो कोणता टॅटू आहे? हे तिच्या चाहत्यांना जाणून घ्यायचं होतं. ज्याचा खुलासा अखेर झाला.

रश्मिाकाने स्वत: तिच्या या टॅटूबद्दल सोशल मीडियावर सांगितलं आहे. ज्यामुळे तिच्या चाहत्यांना याचं उत्तर मिळालं.

tattoos

खरंतर इंस्टाग्राम लाईव्हदरम्या रश्मिकाला तिच्या एका चाहत्या तिला टॅटू दाखवायला सांगितला आणि तिने कोणता टॅटू काढला आहे हे विचारलं. तेव्हा आपल्या चाहत्यांना उत्तर देताना आपला टॅटू दाखवत रश्मिका म्हणाली की, तिने irreplaceable असं आपल्या हातावर लिहिलं आहे.

रश्मिकाने हा टॅटू आपल्या उजव्या हाताच्या मनगटाजवळ काढला आहे.

हेही वाचा :


भाजप-मनसे युती होणार का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *