झोपलेल्या केअरटेकरला हत्तीने पायांनी तुडव तुडव तुडवलं आणि…; VIDEO च्या शेवटी जबरदस्त ट्विस्ट

हत्ती(elephant) शरीराने अवाढव्य प्राणी. ज्याला पाहताच धडकी भरते. पण इतर प्राण्यांप्रमाणे तो तितका आक्रमक नसतो. पण एकदा का तो चवताळला की मग त्याच्या समोर येणाऱ्याचं काही खरं नाही.
हत्तीचे असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहून तुम्हाला सुरुवातीला धडकी भरेल. पण व्हिडीओचा शेवट पाहून थक्क व्हाल
एका हत्ती आणि माणसाच्या फायटिंगचा हा व्हिडीओ आहे. हत्तीला(elephant) माणसांवर किंवा इतर प्राण्यांवर हल्ला करताना तुम्ही पाहिलं आहे. हत्ती-हत्तीमधील फाइटिंगही तुम्ही कदाचित पाहिली असेल. पण हत्ती आणि माणसाची फाइट कधी पाहिली आहे का?
हत्तीचं अवाढव्य शरीर पाहून त्याच्याशी पंगा घेण्याचा विचार कोणती व्यक्ती करेल. पण या व्हिडीओत मात्र तुम्हाला ते पाहायला मिळेल. हे चक्क एका सिंहिणीने सिंहाच्या तावडीतून केली माणसाची सुटका; कधीच पाहिला नसेल असा व्हिडीओत पाहू शकता छोटासा हत्ती सुरुवातीला आपल्या आईसोबत आहे. त्यानंतर तो समोर आडव्या लावलेल्या लोखंडाच्या रॉडमधून कसाबसा बाहेर पडतो.
त्यानंतर तिथं जवळच एका छोट्या गादीवर एक व्यक्ती झोपलेली आहे. हा हत्ती धावत थेट त्या व्यक्तीजवळ जातो. त्या व्यक्तीला लाथा मारू लागतो. बऱ्याच वेळ अशा लाथा मारून मारून तो त्याला गादीवरून उठवतो.
व्यक्तीही काही वेळाने गादीवरून उठते. पण पुन्हा गादीवर झोपते. तेव्हा हत्ती(elephant) पुन्हा त्याला गादीवरून उठवण्याचा प्रयत्न करतो. दोघांमध्ये बराच वेळ अशी फायटिंग होते.
Hey! That's my bed..get up..😠 pic.twitter.com/WX4IaROsvp
— Dr.Samrat Gowda IFS (@IfsSamrat) May 10, 2022
हत्ती(elephant) त्या गादीसाठी त्या व्यक्तीशी लढतो. ही गादी माझी आहे, त्यावरून उठ, त्यावर तू झोपू नको, मी झोपणार असंच तो त्या व्यक्तीला सांगतो आहे. व्हिडीओ शेवटी तुम्ही पाहाल. तर काही करून हत्ती त्या व्यक्तीकडून आपली गादी मिळवतो आणि त्यावर झोपून देतो.
त्यानंतर ती व्यक्तीही त्याच्या शेजारी येऊन त्या गादीवर झोपेत. दोघंही एकत्र एकाच गादीवर शांतपणे झोपतात. व्हिडीओच्या सुरुवातीला हत्तीला व्यक्तीवर हल्ला करताना पाहून धडकी भरते. पण व्हिडीओचा शेवट मात्र क्युट आहे. हे अद्भुत! पाण्याबाहेर काढताच जिवंत मासा ‘काच’ बनला; चमत्कारिक VIRAL @IfsSamrat ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील चौघांना गुजरातमध्ये अटक; 29 वर्षे होते फरार
‘सभा करायच्याच असतील तर अयोध्येत करून दाखवा, पुण्यात तर…’ दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला
ट्विटर डील: एलन मस्क यांचा ट्विटर सीईओ पराग अग्रवाल यांना अल्टिमेटम
‘सुपर डान्सर’च्या सेटवर परतली शिल्पा शेट्टी, ‘इंडियन आयडॉल’ विजेता पवनदीप राजन करणार धमाल