हायवेवर एसटी चालकाला आली चक्कर, पुढे जे घडलं ते थरारक

ST

काही महिन्यांपूर्वी एसटी(ST ) चालकाची तब्येत चालू एसटीमध्ये बिघडल्याची घटना समोर आली होती. आता पुन्हा एकदा तसाच प्रकार घडला आहे. एसटी चालवत असताना अचानक चालकाची तब्येत बिघडली.

दैव बलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना टळली आहे. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भुईंज येथे पुण्याहून तासगावच्या दिशेने निघालेल्या एसटीमधील चालकाला अचानक चक्कर आली. त्यामुळे एसटीवरील नियंत्रण सुटलं. एसटी थेट उसाच्या शेतात गेली.

चालकाचं एसटीवरील नियंत्रण सुटलं आणि उसाच्या शेतातील इलेक्ट्रिक पोलवर धडकली.या बसमध्ये 32 प्रवाशी प्रवास करत होते. सुदैवाने या अपघातात किरकोळ दुखापत वगळता कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

भुईंज पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. ही घटना साताऱ्याच्या आसपास घडल्याची माहिती मिळाली आहे. एसटी चालकाची तब्येत आधीपासूनच बरी नव्हती का? नेमकं काय घडलं याबाबत अजून तरी काहीच माहिती मिळू शकली नाही.

Smart News:-

सराव थांबवला, प्रशिक्षकांना घरी पाठवले, भारताच्या ऑलिम्पिकपदक विजेतीचा राष्ट्रकुलपूर्वी छळ


‘आम्ही चिरफाड केली तर माफीवीरापासून सर्व बाहेर निघेल’; काँग्रेसचा थेट इशारा


कोल्हापूर : खंडपीठ प्रश्न जिव्हाळ्याचा, तातडीने मार्गी लावू ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


सीएम एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटलांच्या भेटीला


Leave a Reply

Your email address will not be published.