प्रसिद्ध अभिनेत्याच्या ‘या’ चुकीमुळे रवीना टंडन करणार होती आत्महत्या!

इंडस्ट्रीमध्ये सेलिब्रिटी त्यांच्या कामामुळे तर चर्चेत असतातचं, पण अधिक चर्चा रंगते ती म्हणजे सेलिब्रिटींच्या खासगी (private life) आयुष्याबद्दल… अभिनेत्री रवीना टंडन देखील रिलेशनशिपमुळे अनेकदा चर्चेत आली. एक काळ असा होता जेव्हा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण सोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघांचा साखरपुडा झाल्याचं देखील समोर आलं. पण एक दिवस असा आला, ज्यामुळे सर्व काही संपलं. एवढंच नाही तर रवीनाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर आलं.

जुलै 1994 मध्ये फिल्मफेअरच्या बातमीनुसार, रवीनाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यामागचे कारण करिश्मा कपूर असल्याचं सांगण्यात येत. कारण अजय आणि करिश्मा एकमेकांच्या प्रचंड जवळ येत होते.(private life)

त्यावेळी रवीनाने अजयवर फसवणूक केल्याचा आरोप केला होता. रवीनाने अजयसोबतचे वैयक्तिक फोटो आणि त्याने लिहिलेले पत्र देखील सर्वांसमोर सादर केले. तेव्हा दोघे प्रचंड चर्चेत आले.

पण आता दोघांचे मार्ग वेगळे झाले आहेत. दोघे त्यांच्या आयुष्यात फार पुढे गेले आहेत. पण मागे घडलेल्या घटना कायम चाहत्यांमध्ये चर्चेत राहिल्या.

हेही वाचा :


धोनीचं ते वागणं जडेजाला खटकलंच..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *