पडद्यामागचं थरारनाटय़ – अवघ्या दोन तासांत उभी राहिली ‘वासूची सासू’

drama

प्रेक्षकांना रंगमंचावरच्या करामती दिसत असतात. पण पडद्यामागेही थक्क करणाऱ्या करामती घडत असतात(drama ). असंच नाटकामागचं थरारनाटय़ रविवारी मुंबई मराठी साहित्य संघात घडलं.

ऐनवेळी ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ नाटकाचा प्रयोग रद्द झाला आणि त्यानंतर अवघ्या दोन तासांत ‘वासूची सासू’ उभी राहिली.

20 नोव्हेंबरला गिरगावच्या मुंबई मराठी साहित्य संघात ‘प्रभु प्रभात’ मासिकाच्या शताब्दीनिमित्त ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकाचा प्रयोग आयोजित केला होता; मात्र त्याच दिवशी नाटकातील प्रमुख कलाकार सागर कारंडे याची तब्येत बिघडली. दुपारी साधारण 2.30 वाजता हे घडलं आणि प्रयोग होता दुपारी 4.30 वाजताचा! शेवटच्या क्षणी प्रयोग रद्द करणे शक्य नव्हते(drama ). अचानक सूत्रधार गोटय़ा सावंत यांनी फोनाफोनी करून ‘अभिजात’ संस्थेच्या ‘वासूची सासू’ या नाटकाचा प्रयोग होईल, असे जाहीर केले. अवघी 120 मिनिटं हातात होती. प्रयोग करण्यावर गोटय़ा सावंत, अभिनेता अमोघ चंदन ठाम होते. त्यानंतर पडद्यामागच्या घडामोडींना वेग आला.

‘वासूची सासू’मधील मुख्य कलाकार म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे, अंकुर वाढवे, आकाश भडसावळे! नयना आपटे 12 दिवस मॉरिशस येथे होत्या आणि त्या योगायोगाने रविवारी सकाळीच मायदेशी आल्या. त्यांनी प्रयोगासाठी लागलीच होकार दिला. ‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकुर वाढवेला समजताच तडक मीरा रोडवरून गिरगावच्या दिशेने निघाला.

नेमका काल मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक होता. अडचणी अनेक होत्या. निर्माता, अभिनेता आकाश भडसावळे एका तालमीसाठी नेरळ ते मुलुंड जात असताना ब्लॉकमधून मार्ग काढत साहित्य संघात पोचले.(drama ) अभिनेता मयुरेश पंडित डोंबिवलीहून निघाला. अमोघ चंदन आणि सुयश पुरोहित यांनीही गाडी साहित्य संघाकडे वळवली. नेपथ्याची गाडी अक्षरशः 10 मिनिटांत दादरच्या गोडाऊनमधून सामान घेऊन निघाली. नाटकाचे लाईट्स आणि म्युझिकव्यवस्था सांभाळणाऱ्यांचे फोन 4 वाजेपर्यंत लागत नव्हते. एकदाचा फोन लागल्यावर तेही कामाला लागले.

मेकअपसाठी कुणी सापडेना. ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ची मेकअप टीमला तयार झाली. आयत्या वेळी ‘विग’ची व्यवस्था करण्यात आली. काहीही करून प्रयोग करायचाच यासाठी कलाकारांचे आणि बॅक स्टेज टीमचे प्रयत्न सुरू होते. मात्र एक मुलगी आधीपासून कल्याण येथे कार्यक्रमात असल्याने तिला येणं शक्य नव्हतं. तेव्हा तिचे दोन प्रवेश करण्यासाठी ‘फॅमिली’ नाटकाची अभिनेत्री सायली हिला उभे केले.

प्रयोग सुरू झाला अन्

सर्वात मोठी अडचण आली ती ‘वासूची सासू’च्या हिरोईन आणि अजून एक पात्र करणाऱ्या कलाकाराचा. दोघेही ‘उंबरठा’ एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत रवींद्र नाटय़ मंदिर दादर येथे काम करत होते; तो स्लॉट सायंकाळी 6 ते 7 दरम्यान होता. त्यांना तिथून येणं शक्य नव्हतं. तेव्हा सूत्रधार गोटय़ा सावंत यांनी आयोजक, परीक्षक, स्पर्धेची टीम यांच्याशी बोलून अभिनेत्री संजना पाटील आणि वल्लभ शिंदे यांना गिरगावला पोचायला सांगितले. तिकडे ‘वासूची सासू’ नाटक सुरू झालं होतं. संजना- वल्लभ यांची एंट्री पहिल्या अंकातील दुसऱ्या प्रवेशाला होती. त्यांना कपडे बदलायलाही वेळ नव्हता, अशी माहिती आकाश भडसावळे यांनी दिली(drama ).

अवघे दोन तास हातात असताना मराठी नाटय़सृष्टीत इतक्या घाईत कुणी प्रयोग केला असेल, असे मला तरी वाटत नाही. आमची तालीम पण झाली नव्हती. काही दिवस प्रयोगही झाले नव्हते. एक अफलातून धाडस आम्ही केले.

मी ‘प्रभु प्रभात’ मासिकाचा बोर्ड मेंबर आहे. आमच्या मंडळातर्फे 1984 पासून आम्ही दरवर्षी एक नाटक दाखवतो. यावर्षी अचानक शो रद्द झाल्याने मोठा प्रश्न उभा ठाकला. ‘वासूची सासू’च्या टीमने ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत इतक्या कमी वेळेत अशक्य ते शक्य करून दाखवले.

Smart News:-