या बड्या स्टारने फिल्म इंडस्ट्रीला केलं अलविदा..!

ब्रूस विलिस हे हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता (hollywood actors) आहेत.त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये अनेक सुपरहिट फिल्म्स केल्या आहेत. दरम्यान अॅक्शन हिरो म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या ब्रूस यांनी आता अभिनय क्षेत्राला अलविदा केले आहे.
इंडस्ट्रीमध्ये (hollywood actors) 40 वर्षांहून अधिक वर्ष काम केल्यानंतर 67 वर्षांच्या ब्रूस विलिस यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. यामागेही एक कारण आहे. मात्र त्यांच्या अशा अचानक निर्णयामुळे चाहत्यांमध्ये नाराजी आहे.
ब्रूस विलिस गेल्या काही काळापासून एका गंभीर आजाराशी सामना करत आहेत. यामुळेच त्यांनी फिल्मी जगतापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. विलिस यांच्या कुटुबीयांकडून अधिकृत निवेदन जारी करत ब्रूस यांच्या आजाराबाबत माहिती दिली आहे.
ब्रूस विलिस गेल्या काही काळापासून एका गंभीर आजाराशी सामना करत आहेत. यामुळेच त्यांनी फिल्मी जगतापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. विलिस यांच्या कुटुबीयांकडून अधिकृत निवेदन जारी करत ब्रूस यांच्या आजाराबाबत माहिती दिली आहे.
ब्रूस यांनी हा निर्णय Aphasia नावाच्या आजारामुळे घेतला आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी अधिकृत निवेदन जारी करून असे म्हटले आहे की, ‘ब्रूसच्या अद्भुत समर्थकांना, एक कुटुंब म्हणून आम्हाला हे सांगायचे आहे की आपल्या प्रिय ब्रूसला काही आरोग्य समस्या आहेत आणि अलीकडेच अॅफेशिया आजाराचे निदान झाले आहे. यामुळे त्यांनी आपली अभिनय कारकीर्द सोडण्याचा निर्णय घेतला आहे, जी गोष्ट त्यांच्या आयुष्यात खूप महत्त्वाची होती.
पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, ‘आमच्या कुटुंबासाठी ही आव्हानात्मक वेळ आहे. आम्ही तुमच्या निरंतर प्रेम आणि समर्थनाची प्रशंसा करतो. आम्ही एक मजबूत कुटुंब म्हणून वाढत आहोत. ब्रूस तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे आम्हांला माहीत आहे, जसे तुम्ही सर्वजण त्याच्यासाठी आहात. ब्रूस ज्याप्रकारे नेहमी म्हणतो, जगत राहा आणि आम्ही तेच करू इच्छितो’.
67 वर्षीय ब्रूस विलिस यांनी 1980 ची टीव्ही मालिका मूनलाइटिंगने प्रसिद्धी मिळवली. यानंतर त्यांनी ‘डाय हार्ड’ या प्रसिद्ध फिल्म फ्रँचायझीमध्ये काम केले. ब्रूस विलिस यांनी आपल्या चार दशकांच्या कारकिर्दीत जवळपास 100 चित्रपटांमध्ये काम केले आहे.
ब्रूस विलिस यांनी त्यांच्या करिअरमध्ये एक गोल्डन ग्लोब आणि दो अॅमी अवॉर्ड्स जिंकले आहेत. त्यांच्या दीर्घकालीन कारकिर्दीमध्ये त्यांनी ‘द वर्डिक्ट’, ‘मूनलाइटिंग’, ‘द बॉक्सिंग’, ‘हॉस्टेज’, ‘आउट ऑफ डेथ’, ‘ग्लास’ यासारख्या सिनेमात काम केले आहे.
ब्रुस विलिसला अॅफेशिया हा भाषेचा विकार आहे. यामध्ये एखाद्याला बोलणं आणि लिहिणं अवघड जातं. हा विकार तुमच्या मेंदूच्या त्या भागाला इजा झाल्यामुळे होतो जो भाषा अभिव्यक्ती आणि समज नियंत्रित करतो. हा आजार तुम्हाला स्ट्रोक किंवा डोक्याला दुखापत झाल्यानंतर होतो. याशिवाय हा आजार ब्रेन ट्यूमरमुळेही होऊ शकतो.
हेही वाचा :