हा भारत आहे पाकिस्तान नाही… कळतंय का?

बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खान  हा लोकप्रिय(popular online) अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या शाहरुख हा ‘पठाण’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. दरम्यान, चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेला शाहरुख हा चित्रपटातील ‘बेशरम रंग’  गाण्यात दीपिका पदुकोणनं परिधान केलेल्या भगव्या बिकिनीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

अनेक धार्मिक संघटनांचे लोक यावर आक्षेप घेत गाण्यातील काही सीन(popular online) हटवण्याची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे चिपटातील ‘झूमे जो पठाण’ हे गाणं प्रदर्शित झालं. त्यानंतर आता बॉलिवूड कलाकारांवर नेहमीच निशाणा साधणारा अभिनेता आणि स्वत: ला चित्रपट समिक्षक म्हणणारा केआरके म्हणजेच कमाल आर खाननं ‘झूमे जो पठाण’ या गाण्यातील शाहरुखच्या लूकवरून त्याला ट्रोल केलं आहे.

केआरकेने हे गाणं पाहिलं असल्याचं म्हणत त्यानं एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये केआरके म्हणाला की, हा भारत आहे पाकिस्तान नाही. ‘मी आता झुमे जो पठाण हे गाणं पाहिलं आणि मी हे सांगू शकतो की या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर कोणीही वाचवू शकत नाही. SRK ने भारतीय प्रेक्षकांशी पंगा घेतला आहे. तो हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे, की पठाण सर्वात वर आहे आणि बाकी सर्व त्याच्या समोर फिके आहेत. एसआरकेजी हा भारत आहे पाकिस्तान नाही.’

‘बेशरम रंग’ या गाण्याप्रमाण ‘झुमे जो पठाण’ हे गाणं विदेशात शूट करण्यात आलं आहे. या गाण्यातही दीपिकाचा ग्लॅमरस लूक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, शाहरुखच्या लूकचं देखील अनेकांनी कौतुक केलं आहे. ‘झूमे जो पठाण’ हे गाणं बॉलिवूडचा लोकप्रिय प्लेबॅक सिंगर अरिजीत सिंगनं गायलं आहे. अरिजीतसोबत हे गाणं सुकृती कक्कर, विशाल आणि शेखर यांनी गायलं आहे. या गाण्याला विशाल-शेखरने संगीतबद्ध केले आहे. हा चित्रपट 25 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

भगव्या रंगाचा काय आहे वाद
‘बेशरम रंग’ गाण्यात दीपिकानं परिधान केलेल्या भगव्या बिकिनीवरून हा वाद सुरु झाला आहे. या वादात अनेक मंत्री, अभिनेते आणि अभिनेत्री प्रतिक्रिया देत असताना अयोध्येतील जगद्गुरू आणि तपस्वी छावणीचे संत परमहंस आचार्य  यांनी शाहरुख खानला धमकी दिली आहे. शाहरुख खान भेटला तर त्याला जिवंत जाळेन अशी धमकी देण्यात आलीय.भाजपच्या मंत्र्यांसह विश्व हिंदू परिषदेने (विहिप) तीव्र विरोध दर्शवला असून त्यात बदल करण्याची मागणी केली आहे. तर इतर पक्षांचे नेते आता सिनेमा आणि सिनेमातील कलाकारांना पाठिंबा देताना दिसत आहेत.

हेही वाचा :