अभिनेता सुशांत शेलारच्या गाडीवर दगडफेक!

अभिनेता आणि शिवसेना चित्रपट सेनेचा कार्याध्यक्ष सुशांत शेलारच्या (Sushant Shelar) गाडीवर दगडफेक आणि गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. यात सुशांतच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. (cctv) गाडीची तोडफोड का आणि कुणी केली याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचं सुशांतने म्हटलंय.
दरम्यान, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला. या प्रकरणी सुशांत ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे, तशी माहिती त्याने दिलीय. ‘नक्की मला सांगता येणार नाही. पण जे काही सध्या सुरु आहे, 15 तारखेला पहाटे 2 ते 2.10 या दरम्यान ही घटना घडली. हा भ्याड हल्ला आहे. त्यांनी कशामुळे हा हल्ला केला कुणाला माहिती. मी पोलीस ठाण्यात जाऊन त्याबाबत तक्रार दाखल करणार आहे’, अशी माहिती अभिनेता सुशांत शेलारने दिलीय.
सीसीटीव्ही व्हिडीओत नेमकं काय?
सुशांत शेलारच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीचा सीटीटीव्ही व्हिडीओ समोर आलाय. यात 15 मे रोजी मध्यरात्री 2 च्या आसपास सुशांतच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक केल्याचं पाहायला मिळत आहे. दगडफेक करण्यात आली त्यावेळी त्याची गाडी पार्किंगमध्ये उभी होती. या प्रकरणी आता पोलीस तपासात काय काय समोर येतं हे पाहावं लागणार आहे.
हेही वाचा :