प्रसिद्ध दिग्दर्शकावर कोसळला दुःखाचा डोंगर…

‘तोरबाज’ (Torbaaz) चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश मलिक (Girish Malik) यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 2022 च्या होळीने त्यांच्या आयुष्याला रंगहीन केलं आहे . मुंबईतील अंधेरी येथील घराच्या पाचव्या मजल्यावरून पडून गिरीश मलिक यांचा 17 वर्षीय मुलगा मनन याचा मृत्यू (death) झाला आहे.
अपघातानंतर कुटुंबीयांनी मननला तातडीने कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात (Kokilaben Dhirubhai Ambani Hospital) दाखल केलं होतं. जिथे त्याने अखेरचा श्वास घेतला. होळीच्या दिवशी मननसोबत घडलेला हा भयानक प्रकार अपघात होता की आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
गिरीश मलिक यांच्या 17 वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर बॉलिवूडसह सर्वत्र शोककळा पसरली आहे. त्यांचे मित्र आणि इंडस्ट्रीतील लोकांना धक्का बसला आहे. लोक त्यांच्यावतीने गिरीश मलिक यांचे सांत्वन करत आहेत.
मनन दुपारी होळी खेळायला गेला होता. आणि काही वेळाने परत आला. घरी परतल्यानंतर काही वेळातच हा अपघात झाला. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर लगेचच मननला रुग्णालयात नेण्यात आले होते.परंतु रुग्णालयात त्याचा मृत्यू (death) झाला.
या दुःखद घटनेची माहिती देताना ‘तोबराज’ चित्रपटातील गिरीश मलिक यांचे पार्टनर पुनीत सिंह म्हणाले की, मलिक यांच्या मुलाचे निधन झाले आहे. याशिवाय हे सर्व कसे घडले याबद्दल मी तुम्हाला अधिक काही सांगू शकत नाही.
हेही वाचा :