‘शमशेरा’तील वाणीचा न्यू लूक व्हायरल!

“शमशेरा” (shamshera) या मच अवेटेड चित्रपटाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. कारण, आज या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च होणार आहे. ट्रेलर लॉन्च होण्याआधी निर्मात्यांनी सर्व मुख्य कलाकारांच्या पात्रांचे पोस्टर रिलीज केले आहेत. आता स्लिम ट्रीम अभिनेत्री वाणी कपूरचाही शमशेराचा फर्स्ट लूक समोर आला आहे.
हँडसम हंक रणबीर कपूर शिवाय या चित्रपटामध्ये वाणी कपूर आणि संजय दत्त देखील आहेत. रणबीरसोबत संजय दत्त आणि वाणी कपूरची झलक निर्मात्यांनी दाखवली आहे.
वाणीचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये वाणी वेगळ्या पेहरावात दिसत आहे. वाणीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिचा जबरदस्त लुक रिलीज केला आहे आणि तिच्या पात्राचे नाव देखील सांगितले आहे.(shamshera)
समोर आलेल्या पात्राच्या पोस्टरमध्ये, वाणी कपूर खुल्या केसांमध्ये लेहेंगा चोली पेहराव्यात दिसत आहे. तिच्या पात्राचे वर्णन करताना वाणी म्हणाली की, तिचे हृदय सोन्यासारखे आहे आणि तिचे नाव सोना आहे. वाणीच्या पोस्टरला लोकांची चांगलीच पसंती मिळत आहे, वाणीचा लूक पाहून केवळ चाहतेच नाही तर बॉलीवूड सेलिब्रिटी देखील खूप प्रभावित झाले आहेत आणि तिचे कौतुक करत आहेत.
चित्रपटात रणबीर एका डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे, तर वाणी एका डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. करण मल्होत्राच्या दिग्दर्शनाखाली बनलेला शमशेरा १८०० च्या पार्श्वभूमीवर आधारीत आहे. आदित्य चोप्रा निर्मित हा चित्रपट २२ जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर २४ जूनला प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :