मराठी चित्रपटसृष्टीवर  शोककळा!ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड..!

ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण  यांचं हृदयविकाराच्या (heart attack) झटक्याने निधन झालं. त्या 61 वर्षांच्या होत्या. प्रेमा यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर  शोककळा पसरली आहे. धूमधडाका, दे दणादण, गडबड घोटाळा, अर्धांगी, सौभाग्यवती सरपंच, माहेरचा आहेर, अर्जुन देवा, उतावळा नवरा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धूमधडाका’  या चित्रपटात त्यांनी अंबाक्काची भूमिका साकारली होती. अभिनेत्रीसोबतच त्या निर्मितीसुद्धा होत्या.

धूमधडाका, दे दणादण, गडबड घोटाळा, अर्धांगी, सौभाग्यवती सरपंच, माहेरचा आहेर, अर्जुन देवा, उतावळा नवरा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धूमधडाका’  या चित्रपटात त्यांनी अंबाक्काची भूमिका साकारली होती.

1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उतावळा नवरा’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती. 2004 मध्ये त्या ‘गाव थोर पुढारी चोर’ या चित्रपटात झळकल्या होत्या. या चित्रपटात त्यांच्यासोबत दिगंबर नाईक आणि किशोर नांदलस्कर मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर ‘फ्रेंडशिप बँड’ आणि ‘एए बीबी केके’ या चित्रपटातदेखील त्यांनी (heart attack) भूमिका साकारली होती.

 

प्रेमा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. नव्या कलाकारांना मालिकांचे पैसे तीन महिन्यांपर्यंत मिळत नाहीत. तसंच पडद्यामागील कलाकारांनाही कोणी वाली नाही. त्यांच्यासाठी राजकीय पक्षाच्या माध्यमातून काम करण्याचं ठरविल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यावेळी त्यांनी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचं सांगितलं होतं.

झी मराठी वाहिनीवरील ‘हे तर काहीच नाही’ या कार्यक्रमात अभिनेत्री प्रेमा किरण यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी ‘दे दणादण’ या चित्रपटातील शूटिंगदरम्यानचा एक किस्सा सांगितला होता. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. “माझा दे दणादण चित्रपट तुम्हाला माहितच असेल. गोल्डन जुबली सिनेमा होता. या चित्रपटातील पोलीसवाल्या सायकलवाल्या या गाण्याच्या शूटिंगच्यावेळी महेश कोठारे यांनी आम्हाला दुपारच्या आत शूटिंग संपवायचं अशी ताकिद दिली होती. मात्र शूटिंग सुरू झाल्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांना सायकल नीट चालवता येत नव्हती. जरा पुढे गेल्यावर त्यांनी मला खाली पाडलं. असं करत करत शूटिंगदरम्यान मी तीन वेळा सायकलवरून पडले होते. मी तीन वेळा पडले म्हणून चित्रपट हिट झाला”, असं त्या म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

हेही वाचा :


आर्थिक वादातून युवकास मारहाण : चौघांवर गुन्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *