विकी कौशल आणि कॅटरिनाचा असा अंदाज पाहिला नसेल !

vicky kaushal and katrina kaif

बॉलीवूडमधील स्टार जोडी म्हणून ओळखले जाणारे अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ (VIKAT) डिसेंबरमध्ये नुकतेच विवाह बंधनात अडकले. यानंतर पहिल्यांदाच विकी-कतरिना (vicky kaushal and katrina kaif) यांनी आपल्या हनीमूनचा पहिला फोटो इंस्टाग्राम अकाउंटवरून चाहत्यांसोबत शेअर केला. हा फोटो पाहताच चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि विकी-कतरिनाच्या आणखी फोटोंची मागणीही चाहत्यांकडून केली जात आहे.

vicky kaushal and katrina kaif

बॉलिवूडचा हँडसम हंक विकी कौशलने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात गर्लफ्रेंड कॅटरिना कैफसोबत लग्न केले. कोरोना काळातच सातफेऱ्या घेतल्याने विकी-कॅट(vicky kaushal and katrina kaif)हनिमूनला जाऊ शकले नाहीत. आणि नंतर ते कामात व्यस्त झाले. काही दिवसांपूर्वी सर्व व्यावसायिक कमिटमेंट्स पूर्ण करून ते दोघेही मिनी हनीमूनला गेले आहेत. एका रात्रीच्या अंधारात दोघेही मुंबई विमानतळावर दिसले होते, येथूनच त्यांचे फोटो बाहेर येत इंटरनेटवर आगीसारखे व्हायरल झाले. ही छायाचित्रे समोर आल्यापासून, चाहते विकी-कॅटच्या हनिमूनच्या अपडेट्सची वाट पाहत होते. हनीमूनमधील रोमांटीक फोटो समोर आल्याने, अखेर चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे.

 

विकी कौशलने अलीकडेच त्याच्या हनीमूनचा पहिला फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. विकी-कॅट (कतरिना कैफ) हनिमून साजरा करण्यासाठी डोंगरावर नाही तर समुद्रकिनारी गेल्याचे या चित्रावरून स्पष्ट होते. विकीने शेअर केलेल्या छायाचित्रात मावळत्या सूर्याची किरणे समुद्राच्या पाण्यावर पडताना दिसत आहेत. ज्यामुळे समुद्राचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे. विकीचा हा फोटो समोर आल्यापासून चाहत्यांनी विकीच्या आणखी फोटोंची मागणी केली आहे. जोपर्यंत विकी आणि कॅट हनीमूनचे आणखी फोटो शेअर करत नाहीत, तोपर्यंत चाहत्यांना चैन पडणार नाही असे दिसत आहे.

हेही वाचा:


शरद पवारांना पंतप्रधान करण्याच्या ठराव केला असता तर…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *