अभिनेत्री रश्मिका मंदानाचा हा वर्कआऊट व्हिडीओ बघाच..!

कोणत्याही सुडौल बांध्याच्या अभिनेत्रीला पाहिल्यानंतर तिच्या सौंदर्यावर आपण लगेचच भाळतो. तिची प्रत्येक अदा आपल्याला भुरळ पाडत असते. पण, या अभिनेत्रींच्या सौंदर्यामागं किती (workout) मेहनत आहे, याचा विचार तुम्ही केलाय कधी?

नाही? मग ‘पुष्पा’ फेम अभिनेत्री रश्मिका मंदानाचा हा वर्कआऊट (workout) व्हिडीओ नक्की पाहा.

कारण कामाप्रती असणारी निष्ठा आणि त्यासाठी मेहनत घेण्याची तयारी नेमकी काय असते, हेच रश्मिकाचा व्हिडीओ पाहून लक्षात येत आहे.

रश्मिकाचं व्यायाम आणि फिटनेसवर विशेष प्रेम. त्यामुळं ती जीममध्ये बराच वेळ घालवताना दिसते.

सध्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रश्मिका कार्डिओ, स्क्वाट्स, लो किक, हाय जम्प इत्यादी व्यायाम प्रकार करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहताना रश्मिकाची ताकद नेमकी किती आहे याचाही अंदाज अगदी सहजपणे लावता येत आहे.

रश्मिका येत्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण करताना दिसणार आहे. यामध्ये ती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्यासोबत झळकणार आहे. ‘मिशन मजनू’ असं तिच्या या आगामी चित्रपटाचं नाव असल्याचं कळत आहे.

रश्मिका गेल्या काही दिवसांमध्ये चर्चेत येण्याचं आणखी एक कारण म्हणजे तिचं खासगी आयुष्य. अभिनेता विजय देवेकरोंडा याच्याशी असणारं तिचं नातं हे मैत्रीपुरताच मर्यादित आहे की यांच्याच प्रेमाचा बहरही आला आहे, हेच जाणून घेण्याची उत्सुकता सध्या चाहत्यांना लागली आहे.

हेही वाचा :


तुम्हीही असे VIDEO पाहत असाल तर सावधान!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *