आलिया भटसोबत लग्नाबद्दल विचारल्यावर रणबीर कपूर म्हणाला…

Wedding Proposal

गेल्या काही दिवसांपासून रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट (Alia Bhatt) यांच्या लग्नाबाबत(Wedding Proposal) अनेक गोष्टी समोर येत आहेत.

काही दिवसांपूर्वी आलिया भटचा सब्यसाचीसोबतचा फोटोही व्हायरल झाला होता, त्यानंतर आलिया अखेर रणबीर कपूरसोबत लग्न करणार असल्याचा अंदाज चाहत्यांनी वर्तवला होता. याशिवाय रणबीर आणि आलिया डिझायनर बिना काननसोबतही स्पॉट झाले होते. दोघांनीही लग्नाची(Wedding Proposal) खरेदी सुरू केली आहे का, असा प्रश्न चाहत्यांना सतत पडतो. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत रणबीर कपूरने लग्नाच्या तारखेशी संबंधित प्रश्नावर प्रतिक्रिया दिली. रणबीरने सांगितले की, तो आणि आलिया लग्न करण्याच्या मूडमध्ये आहेत आणि दोघेही लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत.

रणबीर आणि आलिया अनेक वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. २०१८ मध्ये, जेव्हा दोघांनी ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या प्रेमाला बहर आला. नुकतेच या दोघांनी वाराणसीमध्ये चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. ही पहिलीच वेळ असेल जेव्हा रणबीर कपूर आणि आलिया भट एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, चित्रपट रिलीज होण्याआधी दोघेही लग्नगाठ(Wedding Proposal) बांधत आहेत का?

 

आलिया भटसोबतच्या लग्नाच्या तारखेवर प्रतिक्रिया देताना रणबीर कपूर म्हणाला, “मला पागल कुत्रा चावलेले नाही की मी लग्नाची तारीख मीडियासमोर जाहीर करायला. पण मी हे नक्की सांगू शकतो की मी आणि आलिया दोघेही लग्नाला तयार आहोत. आम्ही नियोजन करत आहोत. आशा आहे की ते लवकरच होईल.” अभिनेत्याने लग्नाची तारीख उघड करण्यास नकार दिला.

आलिया भट आणि रणबीर कपूर हे दोघेही एप्रिल महिन्यात लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या गेल्या महिन्यात आल्या होत्या. या सोहळ्यात दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईकच सहभागी होणार आहेत. कपूर कुटुंबीयांनी या प्रकरणावर मौन बाळगले आहे. रीमा जैन (ऋषी कपूरची बहीण) रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना म्हणाली की दोघेही लग्न करतील, परंतु आम्हाला हे देखील माहित नाही की केव्हा. ते दोघे ठरवतील आणि तुम्हा सर्वांना कळेल. आम्ही कोणतीही तयारी केली नाही, मग इतक्या लवकर लग्न कसे होणार?

Smart News:-

किमान समान कार्यक्रम राबवावा; नाना पटोलेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र


priya marathe : प्रिया मराठे ऊफ तेरी अदा…


दहशतवादी कसाब आमचा नागरिक; पाकिस्तानी मंत्र्याची कबुली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *