प्रियांका चोप्राची मुलगी भारतात कधी येणार? परिणितीनं दिलं उत्तर

Priyanka Chopra & Parineeti Chopra

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) जानेवारी महिन्यात आई झाल्याची घोषणा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. प्रियांका आणि निक जोनस यांनी सरोगसीच्या मदतीने बाळाला जन्म दिला. त्यानंतर प्रियांकाच्या मुलीची पहिली झलक पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. अनेकांनी याबाबत प्रियांका चोप्राला तर सोशल मीडियावर प्रश्न विचारलेच आहेत. पण यासोबतच प्रियांकाची बहीण परिणिती चोप्रालाही (Parineeti Chopra) प्रियांकाच्या (Priyanka Chopra) मुलीबद्दल नुकताच प्रश्न विचारण्यात आला.

सध्या परिणिती चोप्रा ‘हुन्नरबाझ’ या टीव्ही शोसाठी परीक्षक म्हणून काम पाहत आहे. या कार्यक्रमात भारती सिंहने नुकतीच डान्स दिवाने ज्युनिअर्सची घोषणा केली. लहान मुलांबद्दल ही घोषणा ऐकल्यानंतर हर्ष लिंबाचिया फारच उत्साहित होतो आणि परिणितीला सांगतो, ‘परिणिती मी काही गोष्टी नोटीस केल्यात. पूर्वी तू क्लासी अभिनेत्री होतीस आणि आता तू एक मासी अभिनेत्री झाली आहेस. आता तू एक काम कर, पहिल्या फ्लाइटनं तुझ्या भाचीला मुंबईला बोलवून घे.’

हर्षच्या या बोलण्यावर परिणिती त्याला म्हणते, ‘अरे ती अजून फार लहान आहे.’ त्यावर हर्ष तिला म्हणतो, ‘लहान वयातच तिला स्टार बनवूया ना कारण मुंबईमध्ये डान्स दिवाने ज्युनिअर्सची ऑडिशन होत आहे.’ या दोघांच्या संभाषणात भारती सिंह मध्येच बोलते, ‘डान्स दिवाने ज्युनिअर्ससाठी फक्त ४ ते १४ वयोगटातील मुलं ऑडिशन देऊ शकतात.’

दरम्यान प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी २२ जानेवारीला सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांच्या बाळाची माहिती दिली होती. काही दिवसांनंतर निक आणि प्रियांकानं मुलीला जन्म दिल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता सर्वांना प्रियांका आणि निकच्या मुलीची पहिली झलक पाहण्याची उत्सुकता आहे.

Smart News:-

MIM ही राष्ट्रवादीने टाकलेली “गुगली’, कॉंग्रेस आमचा नंबर 1चा शत्रु – दानवे


‘किचन कल्लाकार’ शोमध्ये येणार ‘तुझ्यात जीव रंगला’मधील लाडू


मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर ED ची कारवाई, ठाण्यातील कोटींचे ११ फ्लॅट्स जप्त


IPL 2022 – बुमराहपेक्षाही धोकादायक आहेत हे 5 बॉलर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *