या अभिनेत्रींच्या सोबत ‘ही’ तिसरी सुंदरी आहे तरी कोण?

celebrity

काही सेलिब्रिटी (celebrity) आणि त्यांच्या जगण्याचा अंदाज कायमच चाहत्यांना हेवा वाटण्याजोगा असतो. आपल्या आवडत्या कलाकारांचे मित्रमंडळी कसे असतील, त्यांचं आयुष्य कसं असेल हा प्रश्नसुद्धा एकदा केव्हातरी आपल्या मनात घर करुन जातो. सध्या अशाच एका खास व्यक्तीचा चेहरा नजरा वळवत आहे.

हा चेहरा आहे बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान ,(celebrity) करिष्मा कपूर आणि अमृता अरोरा यांची खास मैत्रीण, नताशा पूनावाला हिचा. (Natasha Poonawala)

फॅशनिस्टा, समाजात एक प्रतिष्ठीत स्थान असणारी महिला आणि सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांची पत्नी, अशी नताशाची ओळख.

celebrity

सीरमच्या संचालकपदी असणाऱ्या नताशानं देशातील काही सामाजिक मुद्द्यांवर प्रकाश टाकत आंतरराष्ट्रीय पातळीवर हे मुद्दे विविध प्रसंगी उचलून धरले आहेत.

विल्लू पूनालावा फाऊंडेशनच्या अध्यक्षपदीही नताशा जबाबदारी पाहत आहे. आदर आणि नताशा यांचा आलिशान बंगला पुण्यात आहे. पण, मुंबईतही त्यांचं आलिशान घर आहे, इथंच अनेकदा काही पार्टी किंवा कार्यक्रमांच्या निमित्तानं बऱ्याच बॉलिवूडकरांची हजेरी पाहायला मिळते.

करिना कपूर खान, मलायका अरोरा, करिष्मा कपूर आणि अमृता अरोरा यांच्यासोबत नताशा वारंवार दिसते. मनिष मल्होत्रा, करण जोहर, सोनम कपूर हे चेहरेही तिच्या मित्रपरिवारात पाहायला मिळतात.

नताशा कोणा मोठ्या सेलिब्रिटीहून लहान नाही. 2006 मध्ये तिनं आदर पूनावाला यांच्याशी लग्न केलं. शरद पवार, विलासराव देशमुक, फारुख अब्हुल्ला, अजित पवार आणि इतर नेतेमंडळी या लग्नसोहळ्यासाठी आले होते.

बॉलिवूडमधूनही बऱ्याचजणांनी या सोहळ्यात हजेरी लावली होती. आदर आणि नताशा यांच्या कुटुंबाला दोन मुलांनी परिपूर्ण केलं. सायरस आणि डॅरियस ही त्या दोघांची नावं.

काही दिवसांपूर्वीच नताशा तिच्या खास मैत्रीणींसोबत म्हणजेच करिना आणि करिष्मा यांच्यासोबत मालदीव येथे सुट्टीसाठी गेली होती. तिथून तिनं या सुट्टीदरम्यानचे काही फोटोही शेअर केले.

खास मैत्रीणींसोबतचे नताशाचे हे खास क्षण पाहताना अनेकांनाच आपल्या गर्ल गँगसोबत असंच कुठेतरी फिरायला जावं असं वाटत असेल, नाही का?

हेही वाचा :


शिक्षण क्षेत्राला हादरवून टाकणारी बातमी!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *