विराट कोहली, मार्क झुकेरबर्ग यांनी दर्शन घेतलेले ‘बाबा नीम करोली’ कोण आहेत?

Virat Kohli

भारताचा अष्टपैलू खेळाडू विराट कोहली(Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा या दोघांनी दोन दिवसापूर्वी उत्तराखंडमधील ‘बाबा नीम करोली’ यांच्या आश्रमाला भेट दिली.

त्यांनी या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यामुळे पुन्हा एकदा उत्तराखंडमधील नीम करोली बाबा यांचे आश्रम चर्चेत आले आहे, हे आश्रम जगभरात प्रसिद्ध असल्याचे बोलले जात आहे. या आश्रमात अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स, फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनीही भेट देऊन बाबा नीम करोली यांचे दर्शन घेतले(Virat Kohli). जगभरातील दिग्गज यांचे भक्त आहेत. कोण आहेत हे नीम करोली बाबा. चला जाणून घेऊया.

उत्तराखंडमध्ये हिमालयाच्या पायथ्याशी एक छोटास आश्रम आहे. नाव आहे- नीम करोली बाबा आश्रम. अतिशय शांत, स्वच्छ जागा, हिरवळ, शांतता. नैनिताल-अल्मोरा मार्गावर समुद्रसपाटीपासून १४०० मीटर उंचीवर असलेला हा आश्रम धार्मिक लोकांमध्ये कैंची धाम म्हणून लोकप्रिय आहे. हा आश्रम बाबा नीम करोली महाराज यांच्या समर्पणाने बांधण्यात आले आहे. बाबा नीम करोली श्री हनुमानाजींचे महान भक्त होते. बाबा यांना त्यांचे भक्त हनुमानाचा अवतार मानत होते(Virat Kohli).

बाबा नीम करोली यांचा जन्म उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील अकबरपूर गावात झाला. नैनिताल, भुवलीपासून 7 किमी अंतरावर असलेल्या कैंची धाम आश्रमाची स्थापना बाबांनी 1964 मध्ये केली होती. 1961 मध्ये ते पहिल्यांदा येथे पोहोचले आणि त्यांचा मित्र पूर्णानंदसोबत आश्रम बांधण्याचा विचार केला. बाबांच्या चमत्कारांची उत्तराखंडमध्येच नव्हे, तर परदेशातही चर्चा होते. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गही त्यांचे भक्त आहेत.

वयाच्या 17 व्या वर्षी बाबा नीम करोली यांना देवाबद्दल विशेष ज्ञान मिळाले. ते हनुमानजींना आपले गुरू मानत होते. बाबांनी आपल्या आयुष्यात जवळपास 108 हनुमान मंदिर बांधली आहेत. सामान्य माणसासारखे बाबा नीम करोली जगले.

ते या काळातील दैवी पुरुषांपैकी एक मानले जातात. उत्तराखंडमधील कैंची धाममध्ये जूनमध्ये वार्षिक सोहळा होतो तेव्हा त्यांच्या भक्तांची मोठी गर्दी असते. कैंची धाममध्येच नव्हे तर भारतातील विविध राज्यांतून त्यांचे अनुयायी येथे येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, हॉलिवूड अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्स, अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स आणि फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांसारख्या सेलिब्रिटींचाही बाबांच्या भक्तांमध्ये समावेश आहे. त्यांनीही कैंची धाम आश्रमात येऊन दर्शन घेतले आहे(Virat Kohli).

बाबा नीम करोली यांच्या पवित्र निवासस्थानाबद्दल अनेक चमत्कारिक कथा सांगितल्या जातात. बाबांचे भक्त आणि सुप्रसिद्ध लेखक रिचर्ड अल्बर्ट यांनी बाबांवर लिहिलेल्या ‘मिरॅकल ऑफ लव्ह’ या पुस्तकात त्यांच्या चमत्कारांचे वर्णन केले आहेत.

Smart News:-