१२ वर्ष मोठी, पदरी मुल तरीही अर्जुन कपूरचा मलायकासाठी का तुटतो जीव?

अभिनेता अर्जुन कपुर (arjun kapoor) आजपर्यंत अनेक चित्रपटातून आपल्या भेटीला आला. त्याचे काही चित्रपट बॉक्स ऑफिस वर फारसे कमाई करू शकले नाहीत परंतु अर्जुन मात्र प्रेक्षकांच्या मनात कायमच हीट राहिला आहे. तो सोशल मिडियावरही बराच सक्रिय असतो. सध्या तो त्याच्या कामापेक्षा त्यांच्या प्रेम संबंधांमुळेच अधिक चर्चेत आहे. अर्जुन का गेली काही वर्षे आपल्यापेक्षा वयाने १२ वर्षे मोठ्या असलेल्या मलायका अरोरा हिच्या प्रेमात आहे. त्यांना अनेकदा ट्रॉल देखील केलं गेलं. पण अर्जुन मात्र या प्रेमावर ठाम आहे. आज अर्जुनचा ३७ वा वाढदिवस, त्या निमित्ताने दोघांच्या नात्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न..

अर्जुन कपूर (arjun kapoor) आणि मलायका अरोरा यांना त्यांच्या वयातील अंतरावरून अनेकदा ट्रोल केलं गेलंय. अर्जुनने वारंवार या ट्रोलिंगवर उत्तर दिलं आहे. दोघेही त्यांच्या प्रेमाबद्दल पूर्णपणे ठाम आहेत. मलायका ही सलमान खानचा मोठा भाऊ अरबाज खान याची बायको. मलायका आणि अरबाज २०१७ मध्ये विभक्त झाले. त्यानंतर अर्जुन आणि मलायका यांची लव्हस्टोरी सुरू झाली. 2019 मध्ये त्यांच्या नात्याची अधिकृतपणे घोषणा केली होती. “वयातील अंतरावरून नात्याला दोष देणं हा निव्वळ मूर्खपणा आहे”, असं अर्जुनने स्पष्टपणे सांगितले होते.

एका मुलाखतीत अर्जुनला विचारण्यात आले होते की, ‘तुझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या तसेच घटस्फोट झालेल्या आणि एका मुलाची आई असलेल्या मलायकासोबत रिलेशनशिपमध्ये येताना तू काय विचार केला होतास?’ या प्रश्नाला अर्जुनने उत्तर दिले की, ‘ आम्ही दोघेही आमच्या नात्याचा आदर करतो. पण आमच्या नात्यात काही मर्यादाही आहेत. तिला जे आवडते ते ती करते आणि तेच मीही करतो. आमच्या नात्याने आमच्या करियरवर कधीच परिणाम होणार नाही. आम्ही एकमेकांना पुरेसा वेळही देतो आणि एकमेकांची स्पेसही जपतो,’ असे उत्तर अर्जुनने दिले होते.

मलायका आणि अर्जुन लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार असून मुंबईतच लग्न करणार असल्याची चर्चा आहे. नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये हे जोडपं लग्न करणार आहे. या लग्नाला केवळ दोघांच्या कुटूंबातील व्यक्ती उपस्थित राहणार असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे लवकरच ही अनोखी प्रेमकहाणी लग्नात रूपांतरित होणार आहे.

हेही वाचा :


क्रुझर पलटी होऊन भीषण अपघात ;सात जण ठार, दहा जण जखमी!

Leave a Reply

Your email address will not be published.