उत्तर प्रदेशच्या झांसी येथे एका 27 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, तिच्या चार वर्षीय मुलीच्या चित्राने आणि साक्षीने प्रकरणाला वेगळेच वळण दिले आहे. मृत महिलेची ओळख सोनाली बुढोलिया अशी असून, तिच्या पती(husband) संदीप बुढोलिया याने हत्या केल्याचा आरोप तिच्या मुलीने केला आहे.

सोनालीच्या सासरच्यांनी ही आत्महत्या असल्याचे सांगितले. मात्र, मुलगी दर्शिता हिने पोलिसांसमोर आणि माध्यमांसमोर दिलेल्या माहितीत तिच्या वडिलांनी(husband) आईला मारहाण करून हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा केला. दर्शिताने सांगितले की, “पप्पांनी आईला मारहाण केली आणि नंतर म्हणाले ‘मरायचे असेल तर मर’. त्यांनी तिचे डोके दगडाने ठेचले आणि मृतदेह फासावर टांगला. नंतर तो पुन्हा खाली उतरवून गोणीत भरून टाकला.”
ती पुढे म्हणाली, “मी त्यांना एकदा सांगितले होते की, जर माझ्या आईला हात लावला, तर मी तुमचा हात मोडेन. पण ते नेहमी तिला मारत आणि म्हणत असत की तू मर, तुझ्या मुलीचीही तशीच अवस्था होईल.”
सोनालीचे वडील संजीव त्रिपाठी यांनी सांगितले की, लग्नाच्या वेळी त्यांनी संदीपच्या कुटुंबाला 20 लाख रुपये हुंडा म्हणून दिला होता. मात्र, काही दिवसांतच त्यांना गाडीची मागणी केली जाऊ लागली. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना ती मागणी पूर्ण करता आली नाही, त्यानंतर सोनालीवर शारीरिक आणि मानसिक छळ सुरू झाला.
सोनालीने मुलीला जन्म दिल्यानंतर तिचा छळ आणखी वाढला. “संदीपला मुलगा हवा होता. मात्र, जेव्हा सोनालीने मुलीला जन्म दिला, तेव्हा त्याने तिला आणि बाळाला रुग्णालयात सोडून दिले. आम्हीच पैसे भरून तिला घरी आणले,” असे तिच्या वडिलांनी सांगितले.

घटनेच्या काही तास आधी सोनाली तिच्या चुलत भावाच्या लग्नाला हजर होती. मात्र, त्यावेळी संदीपने तिला घरी परतण्याचा आग्रह केला. दुसऱ्या दिवशी सोनालीच्या वडिलांना(husband) फोन आला की तिची प्रकृती बिघडली आहे. काही वेळातच दुसरा कॉल आला आणि ती गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती देण्यात आली.
झांसी पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. कोतवाली सिटीचे पोलीस अधिकारी रामवीर सिंग यांनी सांगितले की, “आम्हाला महिलेच्या संशयास्पद मृत्यूची माहिती मिळाली. तिच्या कुटुंबाने तिच्या हत्येचा आरोप केला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.” चार वर्षीय दर्शिताने तिच्या चित्रामध्ये दाखवले की, तिच्या वडिलांनी आईला लाकडी दांडक्याने मारले, गळा दाबून तिचा श्वास कोंडला आणि नंतर मृतदेह लटकवला.
आईच्या अंतिम संस्कारात दर्शिता स्वतःच पुढे सरसावली आणि आपल्या आईचे अंतिम संस्कार केले. ती म्हणाली, “माझ्या वडिलांनी माझ्या आईची हत्या केली आणि पळून गेले. त्यामुळे मीच तिला अग्नी दिला.” पोलिसांनी संदीप बुढोलियाचा शोध सुरू केला असून, तो अद्याप फरार आहे.
हेही वाचा :
‘हा’ नेता पडला 24 वर्षीय तरूणीच्या प्रेमात, गर्लफ्रेंडला सोबत घेऊन केलं हादरवणारं कृत्य
रणवीर अल्लाहबादियाला सर्वोच्च न्यायालयाचा आणखी एक मोठा झटका
संतापजनक! शाळेच्या संस्थाचालकाने गाठली अत्याचाराची परिसीमा; विद्यार्थिनीवर एकदा नव्हे तर तब्बल…