‘मला तुझी पँटी…’; प्रसिद्ध अभिनेत्रीचा कास्टिंग काऊचबद्दल धक्कादायक खुलासा

बॉलिवूडची दुनिया जितकी ग्लॅमरस आहे तितकीच ती चढ-उतारांनी भरलेली आहे. बॉलिवूडमध्ये सुरुवातीच्या काळात अनेक अभिनेत्री(actress) आणि अभिनेत्यांचा अनुभव फारसा चांगला नव्हता. अनेकांना अतिशय धक्कादायक अनुभवही आले आहेत, ज्याला कास्टिंग काऊच असेही म्हणता येईल. आता जे कलाकार बॉलिवूडमध्ये सुपरस्टार आहेत त्यांनाही अनेकदा काही विचित्र प्रसंगांना सामोरे जावे लागले होते आणि त्यांनी ते अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे.

बॉलिवूडची सुपरस्टार असलेली अभिनेत्री(actress) प्रियांका चोप्रा हिला देखील असाच एक विचित्र अनुभव आला होता जेव्हा तिने या इंडस्ट्रीत नवीनच पाऊल ठेवले होते. प्रियांका आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते आणि तिने आजवर अनेक विषयांवर आपली मते परखडपणे मांडली आहेत. प्रियांका केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही तेवढीच प्रसिद्ध आहे.

प्रियांका नेहमीच आपल्या अभिनय प्रवासाबद्दल मोकळेपणाने बोलत असते. एवढेच नाही तर प्रियांकाने तिला आलेला कास्टिंग काऊचचा अनुभवही सांगितला आहे. नुकतेच तिने एका कार्यक्रमात एका बॉलिवूड दिग्दर्शकासोबत आलेला धक्कादायक अनुभव शेअर केला. त्यावेळी प्रियांका चोप्रा केवळ १९ वर्षांची होती. या घटनेने ती इतकी दुखावली आणि घाबरली होती की तिने तो चित्रपट सोडला होता.

प्रियांका चोप्राने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात घडलेली ही घटना सांगितली. वयाच्या १९ व्या वर्षी एका चित्रपटात काम करत असताना तिने दिग्दर्शकाशी संवाद साधला. यावेळी तिने या भूमिकेसाठी नेमके कसे पोशाख लागणार आहेत, तसेच पडद्यावर कसे दिसणे अपेक्षित आहे यासंदर्भात आपल्या स्टायलिस्टशी बोलण्याची विनंती केली होती.

प्रियांकाने सांगितले की, “त्यांनी फोन उचलला आणि म्हणाले की, प्रियांका जेव्हा पँटी दाखवेल तेव्हाच लोक तिचा चित्रपट पाहायला येतील. त्यामुळे ती घालत असलेली पँटी खूप छोटी असायला हवी. मलाही ती पँटी दिसायला हवी. तुला माहिती आहे ना जे लोक पुढे बसलेले असतील? त्यांना ती पँटी दिसायला हवी. त्यांनी चार वेळा ही एकच गोष्ट सांगितली.” हे ऐकून प्रियांकाला काहीच समजत नव्हते.

हेही वाचा :

सगळ्या प्रकरणाचा धनंजय मुंडेच कर्ता करविता; जरांगे पाटलांची वादळी पत्रकार परिषद

Kolhapur News : शिरोलीत चोरीच्या घटना थांबता थांबेना; पंचगंगा नदीवरील केबल चोरट्यांनी नेली चोरून

अरे बाप रे! मुलाने अजगराला उचललं की खेळण्यातली बाहुली, धाडसी मुलाचा व्हिडिओ तुफान व्हायरल

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का, आठवा वेतन आयोग लांबणीवर?