मराठमोळ्या प्राजक्ताचा वेस्टर्न आऊटफिट लूक पाहून चाहते घायाळ म्हणाले…

अभिनेत्री प्राजक्ता माळी मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी(sheen clothing) एक आहे. प्राजक्ताला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्धी मिळालेली आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहिलेल्या प्राजक्ताच्या फॅशनची नेहमीच चर्चा होते.

नुकतंच ‘फिल्मफेयर मराठी २०२४’ पुरस्कार सोहळा(sheen clothing) पार पडला. यावेळी अनेक मराठमोळ्या सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. पुरस्कार सोहळ्यामध्ये, प्राजक्ताने हटके वेस्टर्न आऊटफिट कॅरी करत सगळ्यांचेच लक्ष वेधले. तिची हटके फॅशन पाहून चाहत्यांनी तिला थेट हॉलिवूड अभिनेत्रीचीच उपमा दिलेली आहे.

प्राजक्ता माळी कायमच इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. ती नेहमीच चाहत्यांसोबत स्टायलिश अंदाजामध्ये फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अशातच नुकतंच अभिनेत्रीने चाहत्यांसोबत वेस्टर्न आऊटफिट कॅरी करत ‘फिल्मफेयर मराठी २०२४’ पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यावेळी अभिनेत्रीने, मेटालिक हाय स्लिट ड्रेस परिधान करत बोल्ड लूक केला होता. केस मोकळे सोडून तिने कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक हटके अंदाजात स्टायलिश फोटोशूट केले. यावेळी पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रीने डान्सही केला. तिच्या ह्या मॉर्डन आणि हॉट लूकची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

अभिनेत्रीच्या ह्या मॉडर्न लूकवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असून फॅशनची जोरदार चर्चा होत आहे. ४३ हजारांहून अधिक चाहत्यांनी व्हिडीओवर लाईक्स केले आहेत. तर, अनेक युजर्सने व्हिडीओला कमेंट केली आहे. “ही हॉलिवूडची ॲक्ट्रेस कोण आहे ?”, “तरीच म्हटलं इतकं तापमान का वाढलंय”, “खूपच सुंदर प्राजक्ता” सह अशा अनेक वेगवेगळ्या कमेंट्स चाहत्यांनी केलेल्या आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकर आणि क्रांती रेडकरनेही प्राजक्ताच्या या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. “केस छान दिसत आहेत”, असं दोघींनी म्हटलं आहे.

सध्या प्राजक्ता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोचं सूत्रसंचालन करत आहे. तर आपल्या फॅशन आणि अभिनयाच्या माध्यमातून ती कायमच प्रेक्षकांची मनं जिंकत असते. प्राजक्ताने मराठी चित्रपट, मालिका आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. तिच्या अनेक भूमिकेंच चाहत्यांकडून कौतुक केले जाते.

हेही वाचा :

चंद्रकांतदादांनी भर सभेत शिरोळमधील माधवराव घाटगेंना दिली आमदारकीची ऑफर, पण…

काँग्रेस पक्ष शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांना मानत नाही; मिलिंद देवरा यांचं टीकास्त्र

हातकणंगलेत माने-पाटलांचं ‘या’ उमेदवारांनी वाढवलं टेन्शन; ‘सेम टू सेम’ नावाने घोळ होणार…