नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प (Budget) २०२५ ची लगभग दिल्लीत सुरू झाली असून येत्या काही दिवसांत नवीन आर्थिक वारसातील बजेटला अंतिम स्वरूप दिले जाईल आणि छपाईचे काम सुरू होईल. १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार असून यंदाच्या अर्थसंकल्पाकडून प्रत्येक वर्गातील जनतेच्या अपेक्षा आहेत. अशा स्थितीत, नवीन आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प शेतकरी अनुकूल असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

देशाच्या एकूण GDP मध्ये अन्नदाता शेतकरी १५% हून अधिक योगदान देतात तर ४५% हून अधिक भारतीयांना याच क्षेत्रातून रोजगारही मिळतो. भारताच्या कृषी क्षेत्राने गेल्या पाच वर्षांत सरासरी वार्षिक ४.१८% विकास दर गाठला असून प्रथमदर्शनी ही आकडेवारी भारतीय शेतीसाठी चांगली दिसते. देशातील कष्टकरी शेतकऱ्यांचे योगदान लक्षात घेऊन यावेळचा अर्थसंकल्प(Budget) शेतकऱ्यांचे नशीब बदलणारा ठरू शकतो.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे शेतकऱ्यांनी अनेक महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. कृषी कर्जावरील व्याजदर कमी करण्याची मागणी होत सून कर्जावरील व्याजदर १% कमी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
प्रधानमंत्री किसान योजनेचा वार्षिक हप्ता ६,००० रुपयांवरून १२,००० रुपये करण्याचीही मागणी केंद्राकडे करण्यात आली असून याशिवाय, पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत लहान शेतकऱ्यांचा शून्य प्रीमियमवर विमा काढण्याचे सांगितले गेले आहे. तसेच बी-बियाणे, कृषी यंत्रे आणि खतांवरील जीएसटी कमी कारण्याचाही सल्ला दिला असताना पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्सने कीटकनाशकांवरील जीएसटी १८% वरून ५% करण्याची शिफारस केली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लवकरच तोडगा काढला नाहीत तर अर्थव्यवस्थेचे दीर्घकाळात मोठे नुकसान होऊ शकते. तसेच यामुळे २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मोदी सरकारच्या प्रयत्नांनाही धक्का बसू शकतो.
त्यामुळे, यावेळच्या अर्थसंकल्पात या मुद्द्यांचा समावेश करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. या दरम्यान, सरकारने जानेवारी २०२५ मध्ये डी-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) साठी विशेष पॅकेज जाहीर केले. या पॅकेजअंतर्गत डीएपीच्या किमती आणि जागतिक बाजारपेठेत स्थिर ठेवण्यासाठी प्रतिटन ३,५०० रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
हेही वाचा :
रात्री उशिरा घरी जाणाऱ्या तरुणीच्या 3 पुरुषांकडून पाठलाग, दरवाजा तरुणीला घाबरवलं! अन्…
भाजपकडून लोकशाही हायजॅक; निवडणूक आयोग झालं ताटाखालचं मांजर; राऊतांचा थेट घणाघात
बाबा सिद्दकींच्या मारेकऱ्यांनी 3-4 वेळा रेकी केली, पिस्तूल, बुलेट्सच्या तिन्ही बॅगा एकत्र ठेवल्या अन्…