लखनौ-आग्रा द्रुतगतीमार्गावर बस-टँकरची भीषण टक्कर: १८ ठार, २० जखमी

उन्नाव, उत्तर प्रदेश: लखनौ-आग्रा द्रुतगतीमार्गावर आज पहाटे एक भीषण अपघात (accident)झाला, ज्यात बिहारच्या शिवगडहून दिल्लीकडे जाणाऱ्या स्लीपर बसचा समावेश होता. बेहटा मुजावर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हवाई पट्टीजवळ हा अपघात घडला. बस एका टँकरला धडकल्याने झालेल्या या दुर्घटनेत १८ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर २० जण जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

या दुर्घटनेमुळे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा :

बोगस आधारकार्डाच्या फेऱ्यात अडकली महिला, 14 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा

नदीच्या प्रवाहाशी झुंज! तरुणाच्या शोधार्थ जीवघेण्या 48 तासांची शोधमोहीम

शरद पवारांचे आरोप: सरकारच्या योजना फसव्या आणि लागू होण्याबाबत शंका